(Photo Credit: Pexels)

घोरण्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो का?

Sep 25, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Pexels)

झोपताना घोरणे ही एक सामान्य बाब आहे

(Photo Credit: Pexels)

घोरण्यामुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे

(Photo Credit: Pexels)

दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फ्लिंडर्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मते, जे लोक नियमित घोरतात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो

(Photo Credit: Pexels)

या संशोधनात असे म्हटले आहे की, जेव्हा रक्तवाहिन्यांमधील दाब खूप वाढतो तेव्हा उच्च रक्तदाब होतो

(Photo Credit: Pexels)

या स्थितीमुळे हृदयाला गंभीर नुकसान होऊ शकते आणि स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयविकाराचे धोके वाढतात

(Photo Credit: Pexels)

जर एखाद्याला घोरण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहनही केले आहे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Benefits: मखाणा खाण्याचे आरोग्यदायी फायदे