Winter Diet: हिवाळ्यात 'या' कारणांसाठी करा रताळ्याचे सेवन 

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.gujarati.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Dec 11, 2023

Loksatta Live

हिवाळ्यात रताळी मोठ्या प्रमाणावर का खाल्ली जातात. याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? रताळ्यामध्ये बटाट्याच्या तुलनेत अधिक पोषकतत्त्वे असतात.

रताळे व्हिटॅमिन सी, बी, तसेच फायबर, पोटॅशियम आणि मँगनीजने समृद्ध असते.

रताळ्यातील फायबरयुक्त घटक लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरते.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने निर्धारित केलेल्या माधुमहवर गुणकारी असणाऱ्या दहा सुपर फूड्सच्या यादीत रताळ्याचा समावेश होतो.

उष्णतेमुळे शरीराची दाह होत असेल तर रताळे उकडून खावे.

केशरी रताळे हे बीटा-कॅरोटीनचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मऊ, स्वच्छ आणि कोमल त्वचेसाठी रताळ्याचा हिवाळ्यातील आहाराचा भाग बनवावा. 

रताळ्यातील अँथोसायनिन एक शक्तिशाली जैवउपलब्ध अँटिऑक्सिडेंट आहे जो आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे.

रताळ्यातील बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकते आणि संक्रमाणाला प्रतिबंध करू शकते. 

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आहारात वाढवा लिंबाचा वापर; मिळतील ‘हे’ फायदे