(Photo: Pexels)

स्वयंपाकात वापरताय का ‘ही’ ८ तेलं ?

Jul 29, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels))

पाम तेल (Palm Oil)

पाम तेलात सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. सतत वापर केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

(Photo: Pexels)

 रिफाइंड तेल (Refined Oil)

रिफाइन प्रक्रियेमुळे या तेलांमध्ये नैसर्गिक पोषक घटक नष्ट होतात. त्यामुळे शरीरात दाह निर्माण होऊ शकतो.

(Photo: Pexels)

सोयाबीन तेल (Soybean Oil)

अतिप्रमाणात ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिडमुळे शरीरात असंतुलन निर्माण होऊन सूज, वजनवाढ आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होतात.

(Photo: Pexels)

कॉर्न तेल (Corn Oil)

यात ट्रान्स फॅट्स असू शकतात, जे हृदयासाठी अपायकारक आहेत. नियमित वापर टाळणं योग्य ठरेल.

(Photo: Pexels))

कॅनोला तेल (Canola Oil)

याच्या उत्पादनासाठी जीएम (Genetically Modified) पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे आरोग्याला दीर्घकालीन धोका संभवतो.

(Photo: Pexels)

वनस्पती तेल (Vegetable Oil)

या नावाखाली अनेक तेलांचा एकत्रित वापर केला जातो. हे तेल खूप प्रक्रिया करून तयार केलं जातं आणि त्यामुळे नैसर्गिक गुणधर्म कमी होतात.

(Photo: Freepik)

कापूसबियांचं तेल (Cottonseed Oil)

कीटकनाशकांच्या उरलेल्या अंशांचा धोका अधिक असतो. त्याशिवाय कोलेस्ट्रॉल पातळी वाढवू शकतं.

(Photo: Pexels)

मार्जरीन (Margarine)

मार्जरीनमध्ये ट्रान्स फॅट्स असतात, जे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

(Photo: Pexels)

स्वयंपाकासाठी नेहमी नैसर्गिक आणि प्रक्रिया न केलेली तेलं निवडा.

(Photo: Pexels)

(टीप : जनजागृती करणे हा या माहितीचा उद्देश आहे. आहारात कोणतेही  बदल करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लिंबूपाणी का प्यावं? अमेरिकन डॉक्टर सांगतात ‘हे’ ८ फायदे