(Photo: Freepik)

शरीर देतंय संकेत; मॅग्नेशियम कमी असल्याची 'ही' ८ लक्षणे

Oct 02, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

 थरथरणे

 मॅग्नेशियम कमी झाल्यास स्नायूंना योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे हातपाय थरथरणे, स्नायू खिळणे किंवा अचानक स्पँसम जाणवू शकतात.

(Photo: Freepik)

अत्याधिक थकवा

शरीरात ऊर्जा निर्माण करण्यात मॅग्नेशियम महत्त्वाची भूमिका बजावतो. त्याची कमतरता असल्यास सतत थकवा, कमजोरी व उत्साह कमी होतो.

(Photo: Freepik)

हृदयाची अनियमित धडधड

 हृदयाच्या स्नायूंच्या कार्यासाठी मॅग्नेशियम गरजेचे आहे. त्याची पातळी कमी झाली, तर धडधड वाढणे किंवा ऱ्हिदम बदलणे दिसू शकते.

(Photo: Freepik)

भूक न लागणे व पचन समस्या

काही वेळा मॅग्नेशियम कमी झाल्यास जुलाब, मळमळ किंवा भूकच कमी होते. त्यामुळे वजन घटण्याचीही शक्यता असते.

(Photo: Freepik)

मानसिक आरोग्यावर परिणाम 

चिडचिड, मूड स्विंग्स, सतत चिंता, तणाव किंवा डिप्रेशनसारखी लक्षणे मॅग्नेशियम कमतरतेशी संबंधित असू शकतात.

(Photo: Freepik)

अंग सुन्न होणे 

शरीराच्या न्यूरॉन्सना व्यवस्थित संदेश मिळण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक असतो. त्याची कमतरता असल्यास हातपाय सुन्न पडणे

(Photo: Freepik)

हाडांच्या आरोग्यावर परिणाम 

मॅग्नेशियम, कॅल्शियम शोषणासाठी मदत करतो. त्यामुळे त्याची कमतरता हाडे कमजोर होणे, ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढवते.

(Photo: Freepik)

झोपेची समस्या 

मॅग्नेशियम कमी झाल्यास अनिद्रा, झोप न लागणे किंवा अपुरी झोप यांसारख्या समस्या निर्माण होतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शरीरासाठी ६ तासांची झोप पुरेशी नाही, तुमच्या शरीरावर होऊ शकतात ‘हे’ परिणाम