(Photo: Freepik)

रक्तातील साखर अनपेक्षितपणे वाढवू शकणाऱ्या ‘या’ १० गोष्टींपासून राहा सावध

Jul 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

झोपेचा अभाव

रात्री नीट झोप न झाल्यास शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि त्यामुळे रक्तातील साखर वाढते.

(Photo: Freepik))

कॉफीचे जास्त प्रमाण

कॅफिनमुळे काही लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिकार वाढतो आणि त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते.

(Photo: Freepik))

ताणतणाव

मानसिक तणावामुळे ‘कॉर्टिसोल’ नावाचे संप्रेरक वाढते, जे रक्तातील साखर वाढवण्याचे काम करते.

(Photo: Freepik)

प्राण्यांपासून होणारी अ‍ॅलर्जी

प्राण्यांची अ‍ॅलर्जी ही सूज व तणाव वाढवू शकते. त्यामुळे इन्सुलिनची प्रतिक्रिया बदलू शकते.

(Photo: Freepik)

शरीरात पाण्याची कमतरता

पाणी कमी प्याल्यास रक्त अधिक दाट होते आणि त्यामुळे साखरेची पातळी जास्त मोजली जाते.

(Photo: Freepik)

नियमित न खाणे

वेळेवर न खाल्ल्यास शरीर अ‍ॅड्रेनालिन तयार करतं, ज्यामुळे साखरेची पातळी वाढते.

(Photo: Freepik)

सर्दी किंवा संसर्ग

सर्दी, ताप किंवा कोणताही संसर्ग झाल्यास शरीरात तणाव वाढतो आणि साखरेची पातळी चढते.

(Photo: Freepik))

जास्त प्रक्रिया केलेले अन्न

कृत्रिम घटकांनी भरलेले अन्न किंवा जास्त फॅट असलेले पदार्थ अचानक रक्तशर्करा वाढवू शकतात.

(Photo: Freepik)agram)

गर्भनिरोधक गोळ्या

काही महिलांमध्ये गर्भनिरोधकांमुळे हार्मोन्स बदलतात आणि साखर पातळी वाढते.

(Photo: Freepik))

सकाळी उठल्यावर साखर वाढणे

सकाळी उठल्यावर शरीर जास्त साखर तयार करते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. यालाच Dawn Phenomenon म्हणतात.

(Photo: Freepik)

या गोष्टींकडे लक्ष देणे, नियमित व्यायाम आणि योग्य आहाराच्या सवयी अंगीकारल्यास रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वारंवार हात-पाय सुन्न होतात? ‘हे’ उपाय करून पाहा