नारळपाणी किती प्यावे, त्याचे शरीरावर होणारे परिणाम, नारळपाणी हानिकारक ठरू शकते का, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे 

Dec 07, 2023

Loksatta Live

नारळ भारतात सर्वत्र आढळतात. नारळपाण्याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. 

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या काळात लोकांना त्वचेच्या समस्या उद्भवतात. नारळपाण्याच्या सेवनामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात 

नारळ पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, लॉरिक अॅसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते जे कॅलरीज कमी करण्यास मदत करते. नारळपाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. कारण त्यात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवते.

नारळाचे पाणी रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. कारण त्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

जर तुम्हाला थकवा किंवा तणाव वाटत असेल तर नारळाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला आराम आणि ताजेतवाने वाटू शकते. नारळाच्या पाण्यात भरपूर खनिजे, इलेक्ट्रोलाइट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे तुमची ऊर्जा पातळी त्वरित वाढवण्यास मदत करतात.

नारळाच्या पाण्याचे नियमित सेवन करणे चांगले आहे का? काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. नारळ पाणी पिण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.

नारळाच्या पाण्याचे मर्यादेत सेवन करावे. अन्यथा कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण वाढू शकते

नारळाच्या पाण्याच्या अतिसेवनामुळे जुलाबही होऊ शकतात