(Photo: Freepik)

‘ही’ ग्रीन टी पिण्याची योग्य वेळ

Dec 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

ग्रीन टीमध्ये कॅटेचिनसारखे महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील सूज कमी करून आरोग्य सुधारतात.

(Photo: Freepik)

लिव्हर ते त्वचा 

हा चहा लिव्हर, किडनी, फुप्फुसे आणि त्वचा या सर्वांसाठी उपयुक्त ठरतो. त्यातील हलके कॅफिन मेटाबॉलिझम वाढवतो.

(Photo: Freepik)

 चुकीची वेळ

तज्ज्ञ सांगतात की, ग्रीन टी चुकीच्या वेळी घेतल्यास तिचा आरोग्यदायी प्रभाव कमी होतो आणि त्रास वाढू शकतो.

(Photo: Freepik)

 रिकाम्या पोटी घेणे टाळावे 

रिकाम्या पोटी ग्रीन टी घेतल्याने अॅसिडिटी, पोटफुगी, पोटात दुखणे आणि बेचैनी यांसारखे त्रास होऊ शकतात.

 कॅफिन व टॅनिन 

ग्रीन टीमधील कॅफिन आणि टॅनिन हे न्यूट्रिएंट्सचे अॅब्सॉर्शन कमी करतात, त्यामुळे शरीराला आवश्यक तितके पोषण मिळत नाही.

(Photo: Freepik)

योग्य वेळ 

ग्रीन टी जेवणासोबत किंवा नंतर लगेच न घेता, जेवणाआधी किंवा मधल्या वेळेत घेतल्यास अधिक चांगला परिणाम होतो.

(Photo: Freepik)

डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

ही माहिती सामान्य आरोग्य ज्ञानावर आधारित असून, प्रत्यक्षात अवलंब करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Photos: निसर्गाच्या कुशीत उमललं रूपल नंदचं सौंदर्य