त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर बुमराहने अँड्र्यू बालबिरीनला क्लीन बोल्ड केलं.
तर पाचव्या चेंडूवर लॉर्कन टकरने स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण यष्टिरक्षक संजू सॅमसनने सोपा झेल घेत टकरला आऊट केलं.
पहिल्याच ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत, बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शानदार पुनरागमन केलं.
पाठीची शस्त्रक्रिया बुमराहच्या करिअरसाठी धोक्याची सूचना मानली जात होती.
या अप्रतिम खेळीनंतर बुमराह म्हणाला, "मला खूप छान वाटलं. मी खूप काही गमावलं किंवा काहीतरी नवीन करतोय, असं मला वाटलं नाही. याचं सर्व श्रेय स्टाफला जातं."