(Photo: Pexels)

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवायचंय? ‘हे’ आठ उपाय तुमच्यासाठीच!

Jul 27, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

छोटी छोटी कामे सांगा

मुलांना खिचडी, सँडविच किंवा फळांची प्लेट सजवायला सांगा. स्वयंपाकाशी ओळख होईल आणि मोबाईलकडे दुर्लक्ष होईल.

(Photo: Pexels))

चित्र काढायला सांगा

कॅनव्हास, रंग, कागद दिला की मुलं तासनतास त्यात रमून जातात. चित्रं काढणं, कोलाज तयार करणं  त्यांना सर्जनशील बनवतं

(Photo: Pexels)

खेळ म्हणजे आरोग्य

रोज बाहेर ३०-४५ मिनिटं खेळण्यासाठी मुलांना पाठवा, यामुळे त्यांची ऊर्जा चांगल्या गोष्टींसाठी वापरली जाते.

(Photo: Pexels)

छोटा साहसी गेम

घरातच खजिना शोध किंवा काही वस्तू शोधण्याचा खेळ खेळा. छोट्यांना वाटतं की ते काहीतरी विशेष करत आहेत.

(Photo: Pexels)

 गोष्टी सांगा 

रोज झोपायच्या आधी एक गोष्ट  वाचून किंवा बोलून  मुलांचं मन शांत होतं आणि कल्पनाशक्ती वाढते.

(Photo: Pexels))

घरगुती खेळांची गंमत

लूडो, पत्ते, कॅरम हे खेळ पुन्हा घरात आणा. कुटुंब एकत्र खेळतं तेव्हा मोबाईलचा विसर पडतो.

(Photo: Pexels))

बाग काम करायला सांगा 

माती हातात घेतली की निसर्गाची ओळख होते. मुलांना छोटं रोपटं देऊन त्याला रोज पाणी घालायला सांगा.

(Photo: Pexels)

काहीतरी स्वतः तयार करू द्या

पेटी, बाटल्या, जुने पेपर वापरून काही वस्तू तयार करायला लावा. ‘स्वतः केलंय’ याचा त्यांना अभिमान वाटतो.

(Photo: Pexels)

मुलांना 'नको' सांगण्यापेक्षा 'यात रमून जा' असं सांगितलं की ते स्क्रीनपेक्षा माणसांमध्ये, कृतींमध्ये अधिक रमायला लागतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भारतीय लोक हाताने का जेवतात? जाणून घ्या यामागचं शास्त्र आणि परंपरा