ओल्या कापडाने कधीही स्मार्टवॉचची स्क्रीन साफ करू नका. शक्यतो स्मार्टवॉचची स्क्रीन साफ करताना स्मार्टवॉच 'पॉवर ऑफ' करा. स्मार्टवॉच साफ करताना मायक्रोफायबर क्लोथचा वापर करा. टिश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करू नका. स्मार्टवॉच पाणी किंवा अपायकारक रसायनांपासून दूर ठेवा. काही स्मार्टवॉच जलरोधक (वॉटरप्रूफ) असतात. मात्र डिर्टजट किंवा साबणामुळे ती खराब होण्याची शक्यता असते. स्मार्टवॉचचा पट्टा ओल्या कपड्याने साफ करू शकता. स्मार्टवॉचचा पट्टा तुटला असेल किंवा तो खराब झाला असेल तर तो तात्काळ बदलून घ्या.