लॅपटॉपची स्क्रीन अतिशय नाजूक असते. स्वच्छता करताना काळजी बाळगणे आवश्यक आहे. 'एअर ब्लोअर'च्या मदतीने स्क्रीन आणि तिच्या कोपऱ्यांमध्ये हवा मारून धूळ हटवा. एका मऊ कापडावर व्हिनेगारचे काही थेंब टाका व त्या कापडाने स्क्रीन पुसा. लॅपटॉपच्या स्क्रीनवर सातत्याने धूळ चिकटते. ती हटवण्यासाठी लॅपटॉप बॅगेतच एक मायक्रोफायबर कापड ठेवा.