मोबाइलशिवाय राहण्याचा विचारही सध्याच्या घडीला कोणी करू शकणार नाही. 

फोन, लॅपटॉप, कॅमेरा आणि टीव्ही अशा चार गॅझेटची कामे एकाच स्मार्टफोनमधून होत असल्यामुळे स्मार्टफोन आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे.

मोबाइल फोनची देखभाल म्हणजे तो व्यवस्थित हाताळणे किंवा सतत स्वच्छ ठेवणे इतकीच नाही.

मोबाइलच्या अंतर्गत व्यवस्थेची देखभाल करणे जरुरीचे असते. 

ही अंतर्गत देखभाल अतिशय सोपी आहे. 

अपडेट ठेवणे

हे अपडेट्स मोबाइलची कार्यशैली सुधारण्यासोबतच त्याच्या सुरक्षिततेसाठीही आवश्यक असतात.

फोन रिस्टार्ट करणे

आपला मोबाइल दिवसातून काही मिनिटे तरी स्विच ऑफ ठेवणे कधीही चांगले.

अंतर्गत स्टोअरेजवर लक्ष ठेवा

आपली अंतर्गत स्टोअरेज दोन तृतीयांशपेक्षा अधिक भरणार नाही, याची काळजी घ्या.

महिन्यातून किमान एकदा तरी, अंतर्गत स्टोअरेजमध्ये डोकावून नको असलेले अ‍ॅ्प, फायली हटवून टाका.

फॅक्टरी रिसेटचा वापर

जर इतर कोणत्याही उपायाने आपल्या फोनचा स्पीड वाढत नसेल, तर फोन फॅक्टरी रिसेटचा वापर करावा. ते करण्यापूर्वी डेटा बॅकअप करून  घ्यावा.