२०२४  मध्ये सुरू करू शकता 'हे' नवीन व्यवसाय  

२०२४  मध्ये सुरू करू शकता 'हे' नवीन व्यवसाय  

Dec 05, 2023

Loksatta Live

शाश्वत उत्पादने आणि सेवा - पर्यावरणाला अनुकूल अशी किंवा 'शून्य कचरा' तत्त्व असणारी उत्पादने येत्या काळात महत्त्वाची ठरणार आहेत 

रिमोट वर्क सोल्यूशन्स: – रिमोट वर्क हा प्रकार अधिक प्रचलित होत असून दूरस्थ पद्धतीने काम, तसेच त्याला आवश्यक साधने, तंत्रज्ञान आणि सेवा ऑफर करणार्‍या व्यवसायांसाठी संधी आहे. 

आरोग्याशी संबंधित उद्योग : आरोग्य आणि तंदुरुस्त राहण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.  फिटनेस अॅप्स, मानसिक आरोग्य मार्गदर्शक अॅप्स, आरोग्य आणि फिटनेसशी संबंधित व्यवसाय सुरू करता येऊ शकतो 

वृद्ध लोकांशी संबंधित व्यवसाय : सध्या कालानुरूप वृद्धांना सेवा प्रदान करणे आवश्यक झाले आहे. वृद्धांना आवश्यक असणाऱ्या सेवा, तंत्रज्ञान पुरवणारे व्यवसाय करता येऊ शकतात 

आभासी कार्यक्रम : 'इव्हेंट उद्योग' सध्या विस्तारत आहे. प्रत्यक्ष आणि आभासी स्वरूपात इव्हेंट्स, कॉन्फरन्स आयोजित करण्यासंबंधी व्यवसाय फायदेशीर ठरू शकतो

ई-लर्निंग प्लॅटफॉर्म - शिक्षणाच्या कक्षा सध्या विस्तारत आहेत. कौशल्य प्रशिक्षण, इ लर्निग, वैयक्तिकृत शिक्षण असे व्यवसाय सुरु करता येऊ शकतात 

नूतनीकरणक्षम ऊर्जा संसाधने - टिकाऊपणावर, शाश्वतता, सौर किंवा पवन उर्जा, अक्षय उर्जेवर लक्ष केंद्रित करणारे व्यवसाय भविष्यात फायद्याचे ठरू शकतात 

टेलिमेडिसिन आणि रिमोट हेल्थकेअर: कोविडमध्ये  टेलिमेडिसिनचा अधिक वापर होऊ लागला. रिमोट हेल्थकेअर सोल्यूशन्स, व्हर्च्युअल कन्सल्टन्सी  आणि हेल्थ मॉनिटरिंग ऑफर करणारे व्यवसाय चांगले ठरू शकतात