(Photo Credit: Instagram)

ऑफिसमध्ये 'या' ५ गोष्टी कोणालाही सांगू नका

ऑफिसमध्ये 'या' ५ गोष्टी कोणालाही सांगू नका

Jul 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Meta AI)

ऑफिस

ऑफिसमध्ये आपले चांगले सहकारी बनतात. बरेच लोक सुख दुःखाचे साथीदार मित्रही बनतात, कारण आपण घरानंतर सर्वाधिक वेळ ऑफिसमध्येच असतो.

(Photo: Meta AI)

नकळत

त्यामुळे नकळत आपण वैयक्तिक व व्यावसायिक गोष्टीही ऑफिसमधील सहकाऱ्यांशी शेअर करतो. जे खरंतर नाही केलं पाहिजे.

(Photo: Meta AI)

काय सांगू नये

काही गोष्टी तुमच्या ऑफिसमधल्या मैत्रीतही सहकाऱ्यांना सांगू नयेत, कारण त्याचा तुमच्या कामावर परिणाम होतो.

(Photo: Meta AI)

पगार

तुमच्या सहकाऱ्यांसोबत कधीही पगाराची माहिती चर्चा करू नका किंवा शेअर करू नका. हे कंपनीच्या धोरणाविरुद्ध असते.

(Photo: Meta AI)

जुनी नोकरी

तुमच्या जुन्या नोकरीत काय घडले, तुम्हाला का काढून टाकण्यात आले किंवा तुम्ही का निघून गेलात. हे सर्व सांगू नका. तुमच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले जाऊ शकते.

(Photo: Meta AI)

नाते

ऑफिसमध्ये कोणाशीही तुमच्या नातेसंबंधांबद्दल चर्चा करू नका. बऱ्याचदा, हे गॉसिपचे विषय बनतात.

(Photo: Meta AI)

हे टाळावे

तुम्ही तुमच्या सहकाऱ्यासोबत तुमच्या बॉस किंवा मॅनेजरबद्दल कोणतेही मत देणे किंवा कोणतीही टिप्पणी करणे टाळावे.

(Photo: Meta AI)

घरातील

तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती, उत्पन्न, नातेसंबंध यासारख्या बाबी ऑफिसमध्ये कोणालाही सांगू नका.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पाकिस्तानमधील ५ हजार वर्षे जुने मंदिर, जिथे पडले होते महादेवाचे अश्रू…