(Photo Credit: Instagram)

भारतातली 'ही' ८ आरोग्यदायी पेये तुम्हाला माहितीयेत का?

Aug 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Bihar tourism)

सत्तू सरबत, बिहार

भाजलेल्या बेसनपीठ, पाणी मीठ आणि लिंबाचा रस, तसेच गुळ यापासून बनवलेला पारंपारिक पदार्थ. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड लोकप्रिय. लवकरच पोट भरते आणि उन्हाळ्यात हायड्रेशन साठी परिपूर्ण पेय.

(Photo: Wikimedia Commons)

जिगर थंडा, तामिळनाडू

हा मदुराईतील स्पेशल दुधाचा पदार्थ आहे. यामध्ये बदाम, डिंक, नान्नरी सिरप, आईस्क्रीम आणि साखर यांचे मिश्रण केले जाते.

(Photo: Google Images)

बेल सरबत, उत्तर भारत

 बेल फळाच्या लगद्यापासून बनवलेले हे तिखट आणि सुगंधी पेय आहे. पचनाच्या समस्या असणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त. शरीराला थंड करण्याची क्षमता.

(Photo: Wikimedia Commons)

सोलकढी, महाराष्ट्र

कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवला जाणारा सोलकढी हा पदार्थ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. लसूण आणि हिरव्या मिरच्या घालून बनवले जाते.  पचनासाठी योग्य आणि उन्हाळ्यात मांसाहारानंतर ताजे तवाने करणारे पेय.

(Photo: Wikimedia Commons)

थंडाई, उत्तर भारत

बदाम, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या, वेलची मिरपूड, केशर या सर्वांचे मिश्रण असलेले मसालेदार दुधाचे पेय. अनेकदा होळी सणमध्ये दिले जाते.

(Photo: Google Images)

नन्नरी सरबत, दक्षिण भारत

सरसापरीला वनस्पतीच्या मुळांपासून बनवलेला एक पारंपरिक पदार्थ. थंड पाणी किंवा सोडा मिसळून मातीचा गोडवा देणारा चवदार पदार्थ. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याच्या गुणधर्मांसाठी प्रसिद्ध. 

(Photo: Wikimedia Commons)

कांजी, पंजाब

काळे गाजर, मोहरी आणि पाण्यापासून बनवले जाणारे प्रोबायोटिक पेय. याची चव मुख्यतः तिखट मसालेदार असते. आणि हिवाळ्यामध्ये आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे पेय पिले जाते. 

(Photo: Wikimedia Commons)

कोकम सरबत, कोकण किनारा

कोकम फळांचा अर्क काढून त्यामध्ये साखर आणि मसाले मिसळून लाल रंगाचे हे पेय तयार केले जाते कोकम केवळ ताजे तवानेच करत नाही तर पचनासाठी ही उपयुक्त आहे ते उष्माघात रोखण्यासाठी देखील ओळखले जाते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मृणाल ठाकूरने सांगितलं तिच्या कोमल त्वचेचं सीक्रेट