साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आहे 'इतक्या' कोटींचा मालक; जाणून घ्या संपत्तीचा एकूण आकडा 

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.financialexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Apr 18, 2024

Loksatta Live

अल्लू अर्जुन हे तेलुगू चित्रपट चित्रपटसृष्टीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व असून तो अभिनयाच्या पलीकडे जाऊन अनेक उद्योगही सांभाळतो. अल्लू अर्जुनची एकूण संपत्ति सुमारे 460 कोटी इतकी आहे.

2022 साली अल्लू अर्जुनने त्याचे आजोबा अल्लू रामलिंगय्या यांना श्रद्धांजली देण्यासाठी हैदराबादमध्ये अल्लू स्टुडिओची स्थापना केली. 

आपल्या व्यवसायचा विस्तार करण्यासाठी अल्लू अर्जुनने 2023 मध्ये हैदराबादच्या अमीरपेट येथे त्याच्या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन केले.

ज्युबिली हिल्स, हैदराबाद येथील बफेलो वाइल्ड विंग्स फ्रँचायझीची मालकी घेऊन अल्लू अर्जुनने पाककला क्षेत्रात प्रवेश केला आणि त्याच्या उद्योजकीय करियरमध्ये नवा आयाम जोडला. 

इंस्टाग्रामवर अल्लू अर्जुनचे 25 दशलक्षहून अधिक फॉलोअर्स असून याचा फायदा करून तो वेगवेगळ्या जाहिराती पोस्टच्या माध्यमातून मोठी कमाई करतो.

KFC, Frooti आणि Hero MotoCorp सारख्या प्रख्यात ब्रँडसचा तो ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असून तो यासाठीही मोठे शुल्क आकारतो.  

अल्लू अर्जुन तेलगू आणि तमिळ सामग्री ऑफर करणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म 'अहा' चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.