(Photo: Indian Express)
May 06, 2025
(Photo: Indian Express)
ही पवित्र गुहा जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबल जिल्ह्यातील लिडर खोऱ्यातील अमरनाथ पर्वतावर आहे. इथे जाण्यासाठी दोन मार्गांनी प्रवास केला जातो, एक पहलगाम येथून जो ४८ किमी लांबीचा मार्ग आहे. या मार्गाला सर करण्यासाठी तब्बल ५ दिवस लागतात. दुसरा मार्ग आहे बालटालचा, जो १६ किमी लांब आहे. या मार्गाने प्रवासासाठी २ दिवसांचा कालावधी लागतो.
(Photo: Indian Express)
भगवान शिवाचे प्रतिनिधित्व करणारं बर्फाचं शिवलिंग, गुहेच्या छतावरील फटीतून होणाऱ्या पाण्याच्या गळतीने तयार झालं आहे. पाणी पडत राहतं आणि काही वेळाने गोठतं. त्यातून शिवलिंग तयार होतं. शिवलिंगाला दरवर्षी मे महिन्यात पूर्ण आकार येतो, त्यानंतर ते वितळण्यास सुरुवात होते. ऑगस्टपर्यंत त्याची उंची काही फूटच असते.
(Photo: Indian Express)
या शिवलिंगाच्या शेजारी बर्फापासून तयार झालेल्या दोन आकृत्याही आहेत, ज्या गणपती आणि देवी पार्वतीचं प्रतिक मानल्या जातात.
(Photo: Indian Express)
इतिहासानुसार, १८५० मध्ये बुटा मलिक नावाच्या मुस्लिम मेंढपाळाने ही गुहा शोधली होती. २०११ मध्ये ६.३४ लाख भाविकांनी अमरनाथला भेट दिली, जो एक विक्रम आहे.
(Photo: Indian Express)
१९९० ते २०१७ पर्यंत २७ वर्षांत, अमरनाथ यात्रेवर ३६ दहशतवादी हल्ले झाले, ज्यात ५३ यात्रेकरूंचा मृत्यू झाला, तर १६७ जण जखमी झाले. अमरनाथ यात्रेवर पहिला दहशतवादी हल्ला २००० मध्ये झाला होता.
(Photo: Indian Express)
२००० साली जम्मू आणि काश्मीरच्या फारुख अब्दुल्ला सरकारने यात्रेकरूंच्या सोयीसाठी श्री अमरनाथ श्राइन बोर्डाची स्थापना केली, याचे प्रमुख राज्यपाल होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?