(Photo: Freepik)

भूकंपाची चाहूल प्राण्यांना आधीच लागते का? काय सांगतं संशोधन?

Jul 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

विचित्र वर्तन दिसतं

भूकंप येण्याआधी काही प्राणी अचानक गोंधळलेले, घाबरलेले दिसतात.

(Photo: Freepik)

 प्राणी घराबाहेर पळतात

भूकंप येण्याआधी प्राणी कुत्रे भुंकतात, पक्षी थवा सोडतात, जनावरं घरातून बाहेर पडतात. भूकंपापूर्वी प्राण्यांचे असे वर्तन अनेकदा पाहिले गेले आहे.

(Photo: Freepik)

जुन्या गोष्टी सांगतात

जपान, भारतात असे घडल्याचे अनुभव आधीपासून सांगितले जातात. गावातील लोक प्राण्यांच्या अशा वर्तनावरून संभाव्य भूकंपाचा अंदाज बांधतात.

(Photo: Freepik)

सूक्ष्म हादरे जाणवतात?

शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, प्राण्यांना मानवापेक्षा वेगळ्या पातळीवरचे ध्वनी, कंपन, वायूमधील बदल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल्स जाणवतात.

(Photo: Freepik)

संशोधन काय सांगत?  

काही अभ्यासांमध्ये दिसून आलंय की, भूकंपाच्या २४ ते ४८ तास आधी प्राण्यांच्या काही प्रजातींच्या वर्तनात बदल होतो. मात्र, त्यांचे तसे वर्तन नेहमीच भूकंपाशी जोडता येत नाही.

(Photo: Freepik))

अचूक भाकीत नाही

पण, हे नेहमी भूकंपाशीच संबंधित असतं, असं ठामपणानं सांगता येत नाही.

(Photo: Freepik)

अभ्यास उपयुक्त ठरतोय

प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास सुरू आहे. भविष्यात यावर आधारित पूर्वसूचना देणारी यंत्रणा विकसित होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दुधाशिवाय कॅल्शियम कुठून मिळेल? ‘हे’ १० पदार्थ ठरतील उपयोगी!