(Google Photo)

भारतातले 'हे' ८ गोड पदार्थ नामशेष होण्याच्या मार्गावर...

Aug 04, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Google Photo)

बाबरू - हिमाचल प्रदेश

गहू आणि गुळाच्या पिठापासून बनवला जाणारा तळलेला गोड पदार्थ आहे. तो चवीला अगदी डोनटसारखा लागतो. उत्सवाचा प्रमुख पदार्थ म्हणून ओळखला जाणारा बाबरू आता स्वयंपाकघरातून लुप्त होत चालला आहे.

(Google Photo)

अधिरसम - तामिळनाडू

आंबवलेल्या तांदळाच्या पिठापासून आणि गूळापासून बनवला जातो. त्याला बनवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत असल्याने आता ते घरांमध्ये क्वचितच वेळा बनवले जातात

(Google Photo)

पूथरेकुलू - आंध्र प्रदेश

पूथरेकुलू ही एक आंध्र प्रदेशमधील पारंपरिक गोड डिश आहे. ती तांदळाच्या पिठाच्या पातळ शीट्सपासून बनवली जाते, ज्यामध्ये साखर, तूप आणि सुका मेवा भरला जातो, ही सुद्धा वेळखाऊ असल्याने नामशेष होत आहे.

(Google Photo)

चनार जीलिपी - पश्चिम बंगाल

पनीर पासून बनवलेली मऊ जिलेबी. हळूहळू मिठाईच्या दुकानांमधून गायब होत चालली आहे.

(Google Photo)

खरवस - महाराष्ट्र

खरवस हा पदार्थ नुकत्याच  गायीच्या पहिल्या दुधापासून (कोलोस्ट्रम) बनवला जातो. बदलत्या दुग्धजन्य पद्धतींमुळे हा अनोखा गोड पदार्थ आता दुर्मिळ होत चालला आहे.

(Google Photo)

साटा - महाराष्ट्र, गोवा

साटा हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे, जो खुसखुशीत असतो. हा पदार्थ मुख्यत्वे उन्हाळ्याच्या दिवसात बनवला जातो, पण आता तो पाहायला मिळत नाही.

(Google Photo)

परवल मिठाई - उत्तर प्रदेश

परवल नावाच्या भाजीपासून बनवली जाणारी ही एक पारंपारिक भारतीय मिठाई आहे, जी विशेषतः बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे.

(Google Photo)

आलेपाक - ओडिशा

हा एक जगन्नाथ मंदिरात अर्पण केला जाणारा एक मऊ, गुळाचा गोड पदार्थ. हा दुर्मिळ पदार्थ आता मंदिरांच्या स्वयंपाकघराबाहेर पाह्यलाही मिळत नाही.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करणारे ७ सुपरफूड्स!