(Photo : freepik)

जास्तीत जास्त दिवस टोमॅटो कसे साठवायचे?

Mar 22, 2024

Loksatta Live

(Photo : freepik)

टोमॅटो हा पौष्टिक गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. अनेकदा टोमॅटोचे भाव वाढतात अशावेळी टोमॅटो विकत घ्यावा की नाही, अशी परिस्थिती येते. 

(Photo : freepik)

अनेकांना असे वाटते की कांद्याप्रमाणे टोमॅटो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही. तीन चार दिवसानंतर टोमॅटो खराब होतात. त्यामुळे गरजेनुसार हे लोकं टोमॅटो विकत घेतात पण खरंच टोमॅटो जास्त दिवस साठवून ठेवता येत नाही? 

(Photo : freepik)

टेन्शन घेऊ नका, टोमॅटो एका खास पद्धतीने साठवून ठेवता येऊ शकते. २० -२५ दिवस नाही तर तब्बल तीन महिने तुम्ही टोमॅटो साठवून ठेवू शकता. त्यासाठी ही ट्रिक तुम्हाला जाणून घ्यावी लागेल.

(Photo : freepik)

सुरुवातीला एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या त्यानंतर त्यात मीठ आणि हळद घाला. त्या पाण्यात टोमॅटो टाका. तीस मिनिटे हे टोमॅटो असेच ठेवा.

(Photo : freepik)

तीन मिनिटानंतर हे टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर हे टोमॅटो चांगल्याने पुसून घ्या. प्रत्येक टोमॅटोभोवती न्यूजपेपर गुंडाळा. 

(Photo : freepik)

न्यूजपेपरनी पूर्णपणे टोमॅटो झाकून घ्या. सर्व न्यूजपेपरनी झाकलेले टोमॅटो एका टोपलीत ठेवा आणि टोपली एका बंद कपाटात ठेवा. काळजी घ्या या टोमॅटोवर तीन महिने सूर्यप्रकाश पडू नये.

(Photo : freepik)

आठवड्यातून एकदा या टोमॅटोवरील न्यूजपेपर काढून बघा आणि त्यातील पिकलेले टोमॅटो वापरायला घ्या. 

(Photo : freepik)

टोमॅटो पिकले की ते इथलिन गॅस तयार करतात या गॅसमुळे इतर टोमॅटोंवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. हे पिकलेले टोमॅटो तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून वापरू शकता.