(Photo: Freepik)
Aug 14, 2025
(Photo: Sakshee/Instagram)
१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन. याच दिवशी १९४७ या वर्षी ब्रिटिशांपासून आपण मुक्त झालो. त्यानंतर हा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो.
(Photo: Unsplash)
प्रत्येक वर्षी लाल किल्ल्यावर देशाचे पंतप्रधान तिरंगा फडकवतात व राष्ट्राला संबोधित करतात.
(Photo: Unsplash)
पण भारताच्या या तिरंग्या ध्वजाची रचना कोणी केली? चला याबद्दल जाणून घेऊ.
(Photo: Unsplash)
आपण अभिमानाने फडकावतो तो तिरंगा आंध्र प्रदेशमधील शिक्षणतज्ञ व स्वातंत्र्यसैनिक पिंगली वैंकय्या यांनी डिझाइन केला होता.
(Photo: Unsplash)
२२ जुल्लै १९४७ रोजी संविधान सभेच्या बैठकिमध्ये या भारतीय ध्वजाला अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आलं.
(Photo: Unsplash)
केशरी, पांढरा आणि हिरवा या रंगांचे भारताच्या इतिहासात आणि संस्कृतीत विशेष महत्व आहे. केशरी रंग (किंवा भगवा) त्याग, शौर्य आणि बलिदानाचा प्रतीक आहे. पांढरा रंग शांतता, सत्य आणि शुद्धतेचे प्रतीक आहे, तर हिरवा रंग समृद्धी, सुपीकता आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या संबंधांचे प्रतीक आहे.
(Photo: Unsplash)
तिरंग्याच्या मध्यभागी २४ आऱ्यांचे अशोकचक्र आहे. जे निळ्या रंगामध्ये आहे. तिरंग्यातील अशोक चक्र हे 'धर्मचक्र' किंवा 'प्रगतीचे चक्र' मानले जाते. त्यात २४ आरे आहेत, जे दिवसाचे २४ तास दर्शवतात. हे चक्र सम्राट अशोकाच्या काळातील आहे आणि 'सत्य' आणि 'न्याय' या तत्वांचे प्रतीक आहे.
(Photo: Unsplash)
भारतीय राष्ट्रध्वज, ज्याला तिरंगा म्हणतात, त्याची लांबी आणि रुंदीचे प्रमाण २:३ असते. जर ध्वजाची रुंदी 2 फूट असेल, तर त्याची लांबी 3 फूट असेल. जर ध्वजाची रुंदी 60 सेमी असेल, तर त्याची लांबी 90 सेमी असेल.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
independence day 2025: भारतीय सैनिकांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?