(Photo Credit: Meta Ai)
Jul 23, 2025
(Photo Credit: Meta Ai)
श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानला जातो.
(Photo Credit: Meta Ai)
यंदा २५ जुलैपासून श्रावणाची सुरूवात होत आहे.
(Photo Credit: X)
महादेवांचा देव अशी ख्याती असलेल्या महादेवाची मंदिरं भारतासह जगभर आढळतात, आज आपण पाकिस्तानातील ५००० वर्षे जुन्या मंदिराबद्दल जाणून घेऊया...
(Photo Credit: X)
पाकिस्तानमध्ये कटासराज नावाचे हे मंदिर आहे, जिथे महादेवाचे अश्रू पडले होते असे मानले जाते. हे मंदिर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चकवाल जिल्ह्यामध्ये आहे.
(Photo Credit: X)
कटासराज मंदिराबद्दल असे मानले जाते की जेव्हा माता सतीने स्वतःला अग्निच्या हवाली केले होते तेव्हा सतीच्या वियोगात महादेवाने येथे अश्रू ढाळले.
(Photo Credit: X)
त्यांच्या त्या अश्रूंपासून एक तलाव तयार झाला, ज्याला कटक्ष कुंड म्हटले जाऊ लागले आणि आता त्या तलावाला खूप पवित्र मानले जाते. कटक्ष कुंडावरून या मंदिराचे नाव कटासराज असे झाले.
(Photo : Meta AI)
हे मंदिर महाभारत काळात बांधले गेले असल्याचे सांगितले जाते. पांडवांनी त्यांच्या वनवासाचा काही काळ या मंदिरात घालवला होता असेही म्हटले जाते. मंदिराच्या आजूबाजूला इतर अनेक लहान लहान मंदिरं आहेत, जी १० व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
एलॉन मस्क यांच्या ‘टेस्ला’मध्ये सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय कर्मचारी