अशी बनवा घरच्या घरी नागपूरची संत्रा बर्फी

Jan 19, 2024

Loksatta Live

नागपूरची प्रसिद्ध संत्रा बर्फीसाठी साहित्य - ७५० ग्रॅम संत्र्याचा पल्प, , ५० ग्रॅम साखर, १०० ग्रॅम खोवलेला नारळ, ऑरेंज फूड कलर, २५० ग्रॅम खवा आणि चांदीचे वर्ख

सर्व संत्री सोलून घ्या, सर्व बिया बाजूला काढून घ्या आणि बाकी संत्र्याचा पल्प एका भांड्यात ठेवा

एका कढईत संत्र्याचा पल्प शिजवा, त्यात साखर आणि  केशरी फूड कलर टाका

उकळत्या मिश्रणात खोवलेला नारळ आणि संत्र्याची साल बारीक किसून टाका त्यामुळे चव वाढते.

यात खवा आणि दूध घाला आणि मिश्रण चांगले शिजवून घ्या

शिजलेले मिश्रण एका ट्रेमध्ये टाका आणि नीट पसरलवा त्यावर  चांदीचे वर्ख टाका.

४ तास हे मिश्रण सेट होऊ द्या. सेट झाल्यावर संत्रा बर्फी सर्व्ह करण्यासाठी हव्या त्या आकारात कापून घ्या.