केळी खरेदी करताना 'या' चुका करू नका

Feb 28, 2024

Loksatta Live

(Photo: Unsplash)

केळी प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतात आणि आरोग्यासाठी ती तितकीच फायदेशीर असतात. अनेकदा डॉक्टर केळी खाण्याचा सल्ला देतात.

(Photo: Unsplash)

केळी खाल्ल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते; पण केळी खरेदी करताना आपण बऱ्याचदा चुका करतो.

(Photo: Unsplash)

केळी खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, याविषयी आपण जाणून घेऊ या.

(Photo: Unsplash)

केळी खरेदी करताना केळ्यांचा रंग तपासून घ्यावा. नेहमी पिवळ्या रंगाची केळी खरेदी करावीत.

(Photo: Unsplash)

केळी खरेदी करताना त्यांचे बारकाईने निरीक्षण करावे. केळ्यांवर काळे डाग आहेत का, हे तपासावे. काळे डाग असणारी केळी कधीच खरेदी करू नयेत. अशी केळी खूप लवकर खराब होतात.

(Photo: Unsplash)

गरजेपेक्षा जास्त केळी कधीच खरेदी करू नयेत. एकदोन दिवसांपुरतीच केळी खरेदी करा आणि नेहमी ताजी केळी खाण्याचा प्रयत्न करा.

(Photo: Unsplash)

केळी खरेदी करताना त्यांची साइज बघा. केळी थोडी मोठी आणि जाड असावीत. अशा केळ्यांची चव खूप चांगली असते. कारण- ती पूर्णपणे पिकलेली असतात.

(Photo: Unsplash)

लहान आकाराची केळी कधीच खरेदी करू नयेत. अशी केळी पिकलेली नसतात आणि अशा केळ्यांचे सेवन केल्यामुळे पोटांशी संबंधित आजार होऊ शकतात.

(Photo: Unsplash)

केळ्यांवर थोडा जरी हिरवा रंग असला तरी अशा केळ्यांचे कधीच सेवन करू नये. जर तुम्ही अशी केळी खरेदी केलीत, तर ती लगेच खाऊ नयेत. काही दिवसांनंतर ही केळी खावीत.