पृथ्वीपासून अवकाश किती अंतरावर आहे? शुभांशू शुक्ला किती तासांमध्ये परततील?
Jul 14, 2025
लोकसत्ता ऑनलाइन
(Photo: X)
भारताचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वरून आपले मिशन पूर्ण करून पृथ्वीवर परतत आहेत.
(Photo: X)
शुभांशू आज संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) अंतराळ केंद्रातून निघाले आहेत आणि उद्या म्हणजे १५ जुलै रोजी कॅलिफोर्नियाच्या समुद्रात कॅप्सूलद्वारे खाली उतरतील.
(Photo: X)
अशा परिस्थितीत, तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच उद्भवत असेल की शुभांशू शुक्ला पृथ्वीवर कसे परततील? त्यांना येण्यासाठी किती तास लागतील?
(Photo: X)
२६ जून २०२५ रोजी सुरू झालेल्या या मोहिमेत शुभांशू यांच्याबरोबर त्याच्यासोबत अमेरिकन अंतराळवीर पेगी व्हिटसन, पोलंडचे सॅवोस उजनांस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू आहेत
(Photo: X)
या सर्वांनी अवकाशात १७ दिवस घालवले. या काळात त्यांनी पृथ्वीभोवती २५० हून अधिक वेळा प्रदक्षिणा घातली आणि ६० लाख मैलांचे अंतर कापले. या चौघांनी ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग केले.
(Photo: X)
निरोप समारंभानंतर, शुभांशू शुक्ला १४ जुलै रोजी दुपारी २:२५ वाजता क्रू स्पेसएक्स ड्रॅगन विमानात बसले. यानंतर त्यांचे अंतराळयान दुपारी ४:३४ वाजता आयएसएसपासून वेगळे होणार होते. १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता ते कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरण्याची अपेक्षा आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
जगातला एकमेव देश ज्याच्या ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; हिंदूंची संख्या किती?