उत्तराखंड मध्ये १७ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बोगद्यात अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली. 

Nov 29, 2023

Loksatta Live

१२ नोव्हेंबरपासून उत्तराखंडमधील सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व ४१ कामगारांची मंगळवारी रात्री यशस्वीरित्या सुटका करण्यात आली.

१२ सप्टेंबरपासून या बोगद्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती 

या बचाव कार्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या कर्मचार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले 

पीटीआय फोटो

बचाव करणाऱ्या लोकांनी कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी ५७ मीटरहून अधिक ड्रिल केले

रात्री ८च्या सुमारास पहिल्या कामगारास बाहेर काढण्यात आले आणि रुग्णवाहिकेतून वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले.

पीटीआय फोटो

प्रत्येक कामगाराला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले

पीटीआय फोटो

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी त्याक्षणी उपस्थित होते. कामगारांना बाहेर काढल्यानंतरत्यांनी त्यांचे स्वागतही केले.

पीटीआय फोटो

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, कामगारांना ४८-७२ तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले जाईल.

पीटीआय फोटो

बोगद्याच्या आत तात्पुरती वैद्यकीय सुविधा उभारण्यात आली होती.

पीटीआय फोटो

बोगद्यापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या चिन्यालिसौर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात ४१ ऑक्सिजनसुविधा असणारा बेडसह एक विशेष विभाग तयार करण्यात आला होता.

या कार्यात सर्वांनी एकत्र प्रयत्न केले. त्यामुळे कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढता आले. या कार्याचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले