(Photo: Pexels)
Aug 06, 2025
(Photo: Pexels)
सध्या राज्यामध्ये दादर कबुतरखान्याचा वाद पेटला आहे. आज दादरमध्ये आक्रमक आंदोलनही झालं. तिथली बांबूची ताडपत्री आंदोलकांनी तोडून टाकली. ही सर्व आंदोलक जैन समुदायाची आहेत, असं म्हटलं गेलं.
(Photo: Pexels)
यावरुन जैन धर्मामध्ये कबुतरांना असलेलं महत्व चर्चेत येत आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊ.
(Photo: Pexels)
भारताच्या संस्कृतीमध्ये प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचे सांगितले गेले आहे. पशु- पक्षी यांच्या अन्न - चारा व निवाऱ्याची जबाबदारी घेतल्याने पुण्य लाभतं, असं मानण्यात आलं आहे. हे परंपरेनुसार कित्येक वर्ष सुरुचं आहे.
(Photo: Pexels)
जैन मंदिरे व धर्मशाळांमध्ये कबुतरांना दाणे टाकण्याची परंपरा आहे. कबुतरांच्या संगोपणासाठी त्यांच्या निवासाचीही घरं बांधून सोय केली जाते. जैन साधूंना त्यांच्याविषयी विशेष जिव्हाळा असतो. कबुतरखाना नावाने ट्रस्टही चालवल्या जातात.
(Photo: Pexels)
पक्ष्यांना विशेषत: कबुतरांना अन्न-पाणी खाऊ घातल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते, असे जैन धर्माच्या शिकवणीत सांगितले जाते.
(Photo: Pexels)
जैन समाजात 'जीवदया' ही एक खूप पवित्र परंपरा आहे. या अंतर्गत पक्ष्यांसाठी दाणे-पाणी ठेवले जाते, 'पंछीशाळा' ही (पक्ष्यांचे दवाखाने) चालवल्या जातात.
(Photo: Pexels)
ही माहिती सामान्य स्रोतांवरची असून लोकसत्ता यावरून कुठलाही दावा करत नाही.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केसांसाठी जबरदस्त फायद्याचे भारताच्या विविध भागातले ८ पारंपरिक हेअर ऑइल्स