(Photo: Pexels)
Jun 27, 2025
(Photo: Canva)
एखाद्या अनलिस्टेड कंपनीने आयपीओ आणला असेल तर त्याची किंमत तुम्ही दिलेल्या किंमतीपेक्षा कमी असू शकते. उदाहरणः एचडीबी फायनान्शियलचा आयपीओ त्याच्या शेवटच्या अनलिस्टेड किमतीपेक्षा ४० टक्के कमी होता.
(Photo: Canva)
अनलिस्टेट आयपीओचे व्यवहार सेबी नियमांच्या चौकटीबाहेर होतात. जर काही बाबी चुकीच्या झाल्या तर गुंतवणूकदारांना कोणताही कायदेशीर आधार किंवा संरक्षण राहत नाही.
(Photo: Canva)
थर्ड पार्टी वेबसाइटवर सूचीबद्ध असलेले आयपीओ अनेकदा मोठे मार्कअप जोडतात, ज्यामुळे शेअर्ससाठी जास्त पैसे द्यावे लागू शकतात.
(Photo: Canva)
सूचीबद्ध नसलेल्या कंपन्या खूपच कमी आर्थिक आणि व्यावसायिक माहिती उघड करतात, त्यामुळे त्याबाबत जोखीम किंवा कामगिरीचे मूल्यांकन करणे कठीण होऊन बसते.
(Photo: Canva)
जेव्हा अनलिस्टेड शेअर्स अपारदर्शक प्लॅटफॉर्मवर खरेदी-विक्री केले जातात तेव्हा त्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात बदलू शकतात आणि त्यांची नेमकी खरी किंमत जाणून घेण्यासाठी आपल्याकडे कोणतीही मानक यंत्रणा नाही.
(Photo: Canva)
कंपन्यांचे लिस्टिंग होईपर्यंत बराच मोठा काळ जाऊ शकतो. त्यामुळे शेअर्समध्ये लिक्विडीटी पाहायला मिळत नाही.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ ७ पदार्थ