05 July 2020

News Flash

टॉप गीअर : बजाज प्लॅटिना

चलनवाढ अंशत: कमी झाली तरी तिचा मूळ स्वभाव हा वाढण्याचाच असतो.

संग्रहित छायाचित्र

चलनवाढ अंशत: कमी झाली तरी तिचा मूळ स्वभाव हा वाढण्याचाच असतो. त्यामुळे चलनवाढीपासून आपल्या खिशाचा बचाव कसा करता येईल, याचा विचार आपण करणे महत्त्वाचे आहे. कामानिमित्त तसेच अन्य कारणांसाठी आपल्याला प्रवास करावा लागतो. सार्वजनिक वाहतुकीत असणारी स्थिती, लागणारा वेळ यांच्यावर उपाय म्हणून ग्रामीण, निमशहरी, शहरी व महानगरातील लोक पर्सन्लाइज्ड मोबिलिटीवर भर देतो. त्यामुळे पूर्वी सामान्य लोकांच्या घरात लक्झरी समजली जाणारी दुचाकी ही आता भूलभूत हिस्सा बनली आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच खिशावर भार पडणार नाही, अशी पर्सनल मोबिलिटी निवडतो. काही दिवसांपूर्वी प्रति लिटर ८० रुपयांच्या जवळपास असणारा भाव काहीसा खाली आल्याने दिलासा मिळाला असला तरी लाइफस्टाइल चलनवाढ कमी होत नसते. त्यामुळेच एका लिटरमध्ये अधिकाधिक किलोमीटर जाणारे दुचाकी निवड करण्यावर सामान्यांचा भर असतो. अशा दुचाकींना बाजारपेठेतून मागणी असल्याने कंपन्याही मायलेज फ्रेंडली दुचाकी आणण्यावर भर देतात. या सेगमेंटमध्ये हीर मोटोकॉर्प, होंडा, टीव्हीएस आणि बजाज ऑटो या कंपन्यांच्या दुचाकी असून, त्यांच्यात अधिकाधिक बाजारहिस्सा मिळविण्यासाठी स्पर्धा आहे. त्यामुळेच ग्राहकांना अधिक पर्याय अधिक फीचरसह रास्त किमतीत उपलब्ध आहेत. बजाज ऑटोने कम्युटिंग मोटारसायकलमधील प्लॅटिना ही मोटारसायकल नुकत्याच नव्या फीचरसह लाँच केली आहे.

प्लॅटिना ही बजाज ऑटोची तशी जुनी मोटारसायकल असली तरी त्यामध्ये कंपनीने काळानुसार बदल केले आहेत. वस्तुत: प्लॅटिनाकडे बघितल्यावर विंड १२५ या बजाजच्या जुन्या मोटारसायकलचा भास होतो. कंपनीने प्लॅटिनामध्ये पहिला बदल इलेक्ट्रिक स्टार्ट हा केला आणि आता डेटाइम एलईडी लाइट हे फीचर समाविष्ट  केले आहे. त्यामुळे मोटारसायकलमध्ये एक प्रीमियम लुक आला आहे. मोटारसायकल लाल रंगात तर अधिक चांगली दिसते. तसेच मोटारसायकल लांब असली तरी मोठी वाटत नाही. हेडलॅम्प वायजर नव्याने डिझाइन करण्यात आला असून, त्यामध्ये एलईडी लाइट दिला आहे. फ्यूएल टँकही आकर्षक असून, बोजड रचना वाटत नाही. तसेच, उगाचच मोटारसायकल मोठी दिसण्यासाठी टँकचा आकार वाढविण्यात आलेला नाही. सीटही आकाराने मोठी नाही. तसेच, चालविणाऱ्यास आराम मिळण्यासाठी राडर पोझिशनिंग अपराइट असून, हॅण्डलबारही काहीचा उंच करण्यात आला आहे. मोटारसायकलला इंडिकेटरही क्रिस्टल क्लिअर दिला आहे. त्यामुळेही लुकमध्ये सुधारणा झाली आहे. रिअल डिझाइन व साइड काऊलमध्ये बदल करण्यात आला आहे तसेच, ग्रॅबरेल ब्लॅक फिनिशमध्ये दिले आहे. फूडरेस्टला रबर दिले आहेत. एक्झॉस्ट ब्लॅक फिनिश दिला असून, त्यावरील गार्डला क्रोम फिनिश आहे. तसेच, कम्युटर मोटारसायकलमध्ये स्टाइलिश एक्झॉस्टचा भास होतो. इन्स्ट्रमेंट पॅनल डिजिटल नाही, पण फ्यूएल गॅग दिला आहे. मागील बाजूस डबल स्प्रिंगचे व टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहे. खडबडीत रस्त्यावर कंपनीने मोटारसायकलला दिलेले सस्पेन्शन उत्तम असल्याचा अनुभव येतो. ग्राऊंड क्लिअरन्स २०० एमएम असून, या सेगमेंटमधील सर्वाधिक आहे.

इंजिन

बजाज ऑटोने आपल्या अन्य मोटारसायकलप्रमाणे प्लॅटिनालाही ट्विन स्पार्क प्लगचे सिंगल सिलिंडरचे १०२ सीसीचे इंजिन बसविले आहे. या इंजिनची पॉवर ८.२ पीएस आहे. अधिकाधिक मायलेज कसे मिळेल यासाठी कंपनीने अनेक गोष्टींवर विचार केला आहे. मोटारसायकलचे क्रॅब वजन १११ किलो आहे. सुरुवातील मायलेज का बाप अशी मोटारसायकलचे मार्केटिंग करण्यात आले होते. नतंर सर्वात आरामदायी मोटारसायकल. अर्थात, प्रति लिटर ८० किमीपेक्षा अधिक मायलेज देते, असे कम्युटिंग मोटारसायकलमध्ये बोलले जाते. प्रत्यक्षात ६० ते ७० किमीचे मायलेजही मिळू शकते. अर्थात, रस्त्यावर स्थिती, इंधनाची गुणवत्ता व चालविण्याची सवय यावर बरेच काही अवलंबून आहे. मोटारसायकलचे १०२ सीसीचे इंजिन उत्तम आहे. इकॉनॉमी स्पीडने गाडी चालविताना कोणतेही व्हायब्रेशन जाणवत नाही. तसेच, अशा मोटारसायकल या वेगाने प्रवास करण्यासाठी नसतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक वेगाने सातत्याने मोटारसायकल चालविल्यास व्हायब्रेशन्स जाणवू शकतात. ओव्हर ऑल पॅकेजचा विचार केल्यास प्लॅटिना नक्कीच चांगली वाटते. पण या मोटारसायकलची मूळ स्पर्धा ही स्प्लेंडरशी आहे आणि स्प्लेंडरची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे दोन्ही मोटारसायकल चालवून निवड करा.

obhide@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2017 12:17 am

Web Title: article on bajaj platina bajaj bikes
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 कार खरेदीचे बेस्ट पर्याय..
3 टॉप गीअर : हीरो मोटोकॉर्प एचएफ डीलक्स
Just Now!
X