18 November 2017

News Flash

टॉप गीअर : होंडा एव्हिएटर

एव्हिएटर डिस्क, ड्रम आणि ड्रम-अलॉय मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. इं

ओंकार भिडे | Updated: August 18, 2017 2:03 AM

होंडा कंपनीची दुचाकीमधील ओळख भारतात स्कूटर उत्पादक कंपनी म्हणून अधिक आहे. कंपनीने सुरुवातीस पुरुष आणि महिला दोघांसाठी अ‍ॅक्टिवा लाँच केली. कंपनीच्या यशात या स्कूटरचे यश खूप मोठे आहे. त्यामुळेच गिअरलेस स्कूटरच्या बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्याच्या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून होंडा जुन्या उत्पादनांचे अपगड्रे व्हर्जन आणि त्याच्या जोडीला नवी मॉडेल बाजारात आणत आहे. अ‍ॅक्टिव्हाच्या यशानंतर डिओ ही तरुण ग्राहक डोळ्यासमोर ठेवून लाँच केली. मात्र, फक्त पुरुष ग्राहकांसाठी विशिष्ट अशी स्कूटर होंडाच्या पोर्टफोलिओमध्ये नव्हती. त्यामुळे असा ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेवून होंडाने एव्हिएटर ही तिसरी ऑटोमॅटिक स्कूटर लाँच केली. २००९ च्या आसापास लाँच झालेल्या एव्हिएटर या स्कूटरची अनेक व्हर्जन काळ व ग्राहकांच्या मागणीनुसार लाँच झाली. पर्यावरणाचे निकष बदलल्यावर होंडाने बीएस फोर निकष पूर्ण कणारे इंजिन असणारे एव्हिएटरचे मॉडेल लाँच केले आहे. यामध्ये स्टँडर्ड व डिलक्स अशी मॉडेल उपलब्ध आहेत.

एव्हिएटर डिस्क, ड्रम आणि ड्रम-अलॉय मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. इंजिनची सीसी ११० असून, ८ बीएचपी पॉवर आणि व्ही मॅटिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. या स्कूटरला डिओ व अ‍ॅक्टिव्हाला असणारे इंजिनच बसविले आहे. हे इंजिन प्रूव्हन असून, इंजिन व्हायब्रेशन जाणवत नाहीत. प्रति लिटर ४५ किमी मायलेज मिळू शकते. हायवेर कदाचित मायलेजमध्ये आणखी फरक पडू शकतो. एव्हिएटरची लांबी १८०२ एमएम, उंची ११६२ एमएम आहे. याउलट नेहमीच्या स्कूटरची उंची ही ११४७ एमएम व लांबी १७६१ एमएम आहे. माचो लुक देण्यासाठी स्कूटरची उंची व लांबी ही नेहमीच्या ऑटोमॅटिक स्कूटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळेच स्कूटर मोठी वाटते आणि सरासरी उंची व त्यापेक्षा अधिक उंच असणाऱ्यांना ही स्कूटर एक पर्याय म्हणून नक्कीच उपलब्ध आहे. तसेच, स्कूटरचे क्रॅब वजन १०५ किलो (डिस्क ब्रेक) आहे. पण, वजन कमी करण्यासाठी फायबरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच वजन अधिक वाटत नाही. सीटची उंची ७९० एमएम आहे. त्यामुळे रायिडग पोझिशनमध्ये फरक पडतो. नेहमीच्या स्कूटरची सवय असणाऱ्यांना यावर पहिल्यांदा बसल्यावर थोडे वेगळे वाटते. अधिक उंची असणाऱ्यांना ही स्कूटर चांगली आहे. कारण यातील लेग स्पेसही थोडी अधिक आहे. २० लिटरची डिक्की दिली असून, त्यामध्ये चार्जर पॉइंट (स्डँडर्ड फीचर नाही) दिली आहे. तसेच, डिक्की मोठी असल्याने यात हेल्मेट आरामात मावते.

स्कूटरला अपििलग लुक देण्यासाठी पुढील बाजूस क्रोमचा वापर केला आहे. तसेच, हॅलोजन हेडलॅम्प दिला आहे. प्रीमियम लुकसाठी ब्राउन रंगाची सीट दिली आहे. इन्स्ट्रमेंट पॅनल साधाच आहे. प्रत्यक्षात तो सेमी डिजिटल द्यायला हवा होता. पाच स्पोकचे अलॉयव्हील, ट्यूबलेस टायर, ऑटो हेडलॅम्प ऑन, डिस्कब्रेक दिला आहे. तसेच, होंडाची कॉम्बीब्रेकिंग सिस्टिमही एव्हिएटरला आहे. आरामदायी प्रवासासाठी पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन आहे. तसेच, टेललॅम्प व इंडिकेटरला नवा लुक दिला आहे. त्यामुळे मागील बाजूने एव्हिएटर आकर्षक वाटते. एव्हिएटर ही ११० सीसी सेगमेंटमधील अन्य स्कूटरसारखीच आहे. यातील मोठा फरक म्हणजे या स्कूटरची उंची व लांबी हा आहे. थोडी माचो लुक स्कूटर आवडणाऱ्यांसाठी ही स्कूटर पर्याय आहे. मात्र, उंची कमी असली तरी अन्य कंपन्यांच्या ऑटोमॅटिक स्कूटर १२५ सीसीमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे एव्हिएटर घेताना १२५ सीसी ऑटोमॅटिक स्कूटरचा पर्याय पाहून आणि त्या चालवून कोणती स्कूटर घ्यायची हा निर्णय घ्यावा.

obhide@gmail.com

First Published on August 18, 2017 2:03 am

Web Title: article on honda aviator