News Flash

विश्वासार्ह सेडान

डिझेल प्रकारातील अल्टीसची किंमत १७ लाख ३६ हजारांपासून पुढे सुरू होते.

टोयोटा कोरोला ही जगामध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार असून, ४० दशलक्षपेक्षा अधिक कारची विक्री आतापर्यंत झाली आहे. भारतामध्ये कोरोलाचे २००३ मध्ये अनावरण करण्यात आले आणि त्यानंतर या कारची विक्री सर्वोत्कृष्टच राहिली आहे. कोरोलाच्या नवीन पिढीतील अल्टीसचालू वर्षांच्या मार्च महिन्यात भारतात दाखल करण्यात आली असून, ती पूर्वीपेक्षा खूपच आकर्षक स्वरूपात आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांत उपलब्ध असलेली नवीन कोरोला अल्टीस सेडान कशी आहे, त्याचा घेतलेला आढावा.

नवीन कोरोला अल्टीस गतिमान आणि प्रतिष्ठित डिझाईनसह तयार करण्यात आली असून, प्रगत अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जागतिक स्तरावरील टोयोटाच्या सेडानमध्ये बसल्याची अनुभूती अल्टीसमधून प्रवास केल्यावर मिळते. सुपर सीव्हीटी-आय७ अ‍ॅटोमॅटिक गिअरबॉक्ससह असामान्य प्रदर्शन आणि स्पोर्ट मोड व पॅडल शिफ्ट यामध्ये आहेत. सुरक्षेची अनेक वैशिष्टय़े समाविष्ट करण्यात आली आल्याने टोयोटाची सुरक्षिततेसाठीची असणारी बांधिलकी कायम असल्याचे दिसून येते. तसेच या सेडानची किंमतही या सेगमेंटमधील इतर स्पर्धकांच्या तुलनेत सामान्य असल्याने कमी किमतीत अधिक सुविधा आणि गाडी चालवण्याचा वेगळाच आनंद यामुळे मिळेल.

इंजिन

टोयोटा अल्टीस पेट्रोल आणि डिझेल प्रकारामध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून, पेट्रोल सेडानची किंमत १५ लाख ८७ हजारांपासून सुरू होते, तर डिझेल प्रकारातील अल्टीसची किंमत १७ लाख ३६ हजारांपासून पुढे सुरू होते. पेट्रोल इंजिन १.८ लिटरचे असून १३८ बीएचपीची ऊर्जा यातून निर्माण होते. तसेच याचा पीक टॉर्क १७३ आहे. अल्टीसमध्ये ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह सीव्हीटी अ‍ॅटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहे. कोरोला अल्टीस डिझेल १.४ लिटर, चार सिलेंडर, टुब्रोचार्ज इंजिनसह देण्यात आले असून, ८७ बीएचपी पीक पॉवर आहे. २०५ एनएमचा पीक टॉर्क असून, ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर वेग घेताना ही अतिशय उत्तम प्रदर्शन करते. सहाव्या गिअरला रस्त्यावरून चालताना ती अतिशय गतीने वेग पकडते. त्यामुळे अल्टीसच्या ड्रायव्हिंग करण्याचा वेगळाच आनंद येतो. अल्टीसचे इंजिन नव्याने तयार करण्यात आलेले असून, प्रत्येक वेळी ते अतिशय स्मूथ आणि आवाज न करता चालते. त्यामुळे गाडीमध्ये बसल्यावर इंजिनच्या आवाजाने होणारा त्रास जाणवत नाही.

अंतर्गत रचना

अल्टीसची अंतर्गत रचना साधारण टोयोटाच्या इतर गाडय़ांप्रमाणेच वाटते. अधिक प्रमाणात यामध्ये विशेष असा बदल दिसून येत नाहीत. मात्र मागील सीटवर बसल्यानंतर अतिशय आरामदायक वाटते. आतमध्ये बसण्यासाठी मोठी जागा असून, प्रवास करताना अवघडल्यासारखे वाटत नाही. विशेषत: मागील सीटवर बसल्यावर अल्टीसमध्ये जेवढे आरामदायी वाटते, तसा अनुभव इतर सेडानमध्ये येत नाही. साऊंडचा आवाज उत्तम आहे. नवीन टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यामध्ये देण्यात आली आहे. यामध्ये थोडीफार सुधारणा करण्यात आली आहे. अल्टीसमध्ये नव्याने डिझाईन करण्यात आलेले इन्स्ट्रमेंट पॅनेल सॉफ्ट टच डॅशबोर्ड देण्यात इन्स्ट्रमेंटसह देण्यात आले आहे. आतील रंग अतिशय उत्तम असून, तो रिफ्रेश करण्यात आला आहे. अल्टीसमध्ये सूक्ष्म आयन जनरेटर आहेत. अ‍ॅटोफोल्ड आणि रिव्हर्स लिंक्ड ओरव्हीएम देण्यात आल्याने पार्किंग करताना अडचण निर्माण होत नाही.

अल्टीस का खरेदी करावी?

काही किरकोळ बदल करत नवीन अल्टीस दाखल करण्यात आली आहे. मात्र इंजिन, हेडलाइट, मागील सीटवर जाणवणारा आरामदायीपणा, सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेली पुरेशी काळजी यामुळे ही कार इतर सेडानच्या तुलनेत आघाडी घेते. केबिनची प्रशस्त रचना, शांत आणि सुसज्ज अशी आहे. तसेच अल्टीसमधून प्रवास अधिक आरामदायी होतो. हाताळण्यास अपेक्षेप्रमाणे सोपी आहे. अंतर्गत डिझाइन रिफ्रेश करण्यामुळे, अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे ही कार अद्ययावत वाटू शकते. अल्टीसची किंमत साधारण १५ लाख ८७ हजारांपासून सुरू होत असून या सेगमेंटमध्ये ही खूप महाग अशी कार नक्कीच नाही. मात्र ती थोडी महाग असल्याचे वाटू शकते. मात्र जर तुम्हाला कार्यक्षम आणि विश्वासार्ह सेडान हवी असेल तर कोरोला अल्टीस हा आतापर्यंत एक सुरक्षित पर्याय तुमच्यासमोर आहे.

इतर वैशिष्टय़े

चालकाची सीट इलेक्ट्रिकली अ‍ॅडजेस्टेबल देण्यात आली असून, क्रूज कंट्रोल, हेडलॅम्प, वायपर हे अ‍ॅटोमॅटिक आहेत. मागील कॅमेरा स्वयंचलित आहे. अल्टीसमधील वातानुकूलिन यंत्रणा अतिशय उत्तम असून, बाहेरील उच्च तापमानामध्येही केबिनमध्ये बसल्यावर अतिशय आल्हादायक वाटते. अल्टीसमध्ये इतर स्पर्धकांच्या तुलनेत अधिक सेवा देण्यात आली आहे. मात्र असे जरी असले तरी इतरांच्या तुलनेत यामध्ये सनरूफ, टू झोन क्लायमेट कंट्रोल, हवेशीर जागा, फ्रंट पार्किंग सेन्सर आणि सोयीचे असणारे वन टच लेन चेंज इंडिकेटर याचा अभाव आढळतो. अल्टीसमध्ये नवीन ३डी बम्पर डिझाइन देण्यात आले असून, ते अधिक आकर्षक आहे. गाडीच्या समोरील भागामध्ये प्रगत असे ग्रिल डिझाईन देण्यात आले असून, त्यामुळे अल्टीस अधिक स्टायलिश वाटते. अल्टीसमध्ये नवीन एलईडी हेडलाइट, एलईडी डे-टाइम रनिंग लॅम्प देण्यात आले आहेत. हेडलाइट बीईम एलईडी असून रस्त्यावर उत्तम प्रकारे प्रकाश पडतो. हेडलाइट अतिशय शक्तिशाली आहेत. त्यामुळे एखाद्या गाडीस ओव्हरटेक करताना हॉर्न वाजविण्याऐवजी फ्लॅश मारला तरी पुरेसा ठरतो. अत्याधुनिक नवीन अ‍ॅलॉय यामध्ये देण्यात आले आहेत.

चालवण्याचा अनुभव

अल्टीसचे स्टेअरिंग हाताळण्यास उत्तम आहे. अल्टीस ट्रॅफिकमध्ये अडकल्यास गिअर बदलताना त्रास सहन करावा लागत नाही. अल्टीस कमी वेळेत अधिक वेग घेत असल्याने हायवेवर चालवितानाही आराम मिळतो. खडबडीत रस्त्यांवरही कार चालवताना धक्के जाणवत नाहीत. त्यामुळे आरामदायी वाटते. ट्रॅफिकमध्ये चालविताना सेडान कमी मायलेज देते. मात्र ज्या वेळी अल्टीस हायवेवर पळते, त्या वेळी मायलेजमध्ये वाढ दिसून येते. १५ इंच व्हील्स आणि टायरची साइडवॉल मोठी असल्याने कोरोला अल्टीस इतर स्पर्धकांच्या तुलनेत अधिक आरामदायक वाटते.

सुरक्षेला प्राधान्य

टोयोटाने सुरक्षिततेसाठीची असणारी बांधिलकी कायम ठेवली आहे. टोयोटाने कोरोला अल्टीसमध्येही प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती काळजी घेतली आहे. अल्टीसमध्ये ७ एअरबॅग्ज देण्यात आली आहेत. कारमध्ये दोनवरून सात एअरबॅग्ज केल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात येत असल्याचे दिसून येते. व्हेइकल स्टॅबिलिटी कंट्रोलचा समावेश या सेडानमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अल्टीस चालवताना एका सरळ रेषेत चालते. कारमध्ये हील स्टार्ट असिस्ट कंट्रोल देण्यात आले आहेत. तसेच एबीएस आणि ईबीडी प्रणाली बीएसह देण्यात आली आहे.

ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2017 12:16 am

Web Title: article on toyota corolla altis
Next Stories
1 टॉप गीअर : हिरो ग्लॅमर १२५
2 कोणती कार घेऊ?
3 टेस्ट ड्राइव्ह : देखणी ‘कॅप्चर’
Just Now!
X