News Flash

ऑटोमॅटिक ‘टियागो’!

टियोग एएमटी ड्रायव्हिंगचा आमचा अनुभव कसा होता, त्याचा घेतलेला आढावा.

टाटा मोटर्सने टियागो या कारचे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) मॉडेल नुकतेच लाँच केले आहे.

टाटा मोटर्सने टियागो या कारचे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) मॉडेल नुकतेच लाँच केले आहे. ही कार एक्सटीए व एक्सझेडए या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. टियोग एएमटी ड्रायव्हिंगचा आमचा अनुभव कसा होता, त्याचा घेतलेला आढावा.

गिअर्ड स्कूटरकडून मोटरसायकलकडे गेलेली दुचाकी वाहनांची बाजारपेठ पुन्हा गिअरलेसच्या बाजारपेठेकडे येत असून, त्यामध्ये झपाटय़ाने वाढ होत आहे. आपल्याकडे कारच्या विक्रीतही सातत्याने वाढच दिसत आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस शहरातील वाहतूक वाढते आहे. (यामागे अनेक कारणे आहेत.) त्यामुळेच शहरांतून वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. अशावेळी म्हणजे बम्पर टू बम्पर ट्रॅफिकमध्ये कारचे गिअर सतत बदलणे हे क्लेशदायी वाटते. त्यामुळेच कार कंपन्यांनी ऑटोमॅटिक कारचा पर्याय उपलब्ध केले आहेत. पण, ऑटोमॅटिक कारचे मायलेज (म्हणजे प्रति लिटरमध्ये किती किलोमीटर अंतर कापते) हे सर्वासाठी महत्त्वाची बाब आहे. चालविणाऱ्यास कोणताही त्रास जाणवू नये तसेच, पॉवर, पिकअप लॉस, लक्झरी आदींचा अभाव वाटू नये याची काळजी ऑटोमॅटिक कारमध्ये घेतली जाते. पण, या कारचे मायलेज हे गिअर्ड कारपेक्षा फारच कमी असते. त्यामुळेच या कार बाजारपेठेत असूनही फारशा ग्राहकप्रिय नाहीत. मात्र, गिअर असूनही गिअरलेस कार ड्रायव्हिंगचे तंत्रज्ञान एंट्री लेव्हल कारमध्ये उपलब्ध करून देण्यात वाहन उत्पादन कंपन्यांना यश आले आहे. त्यामुळेच मारुती सुझुकी, टाटा मोटर्स व रेनॉ या कंपन्यांचा त्यात समावेश आहे.

टाटा मोटर्सने टियागो या इम्पॅक्ट डिझाइनवर आधारित एंट्रीलेव्हल हॅचबॅक कारमध्ये ऑटोमॅटिक कारला पर्याय ठरणारे ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन (एएमटी) उपलब्ध करून दिले आहे. यामध्ये क्लचलेस ड्रायव्हिंगची मजा तीही रास्त किमतीत मिळत आहे. टियागो एएमटीमध्ये अंतर्गत व बर्हिगत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. इंजिन, सीसी, बीएचपी, ट्रान्समिशनही सारखे आहे. केवळ यास एएमटी देण्यात आले आहे. बाहेरून कारमध्ये ऑटोमॅटिक असल्याचा फरक केवळ ‘एक्सझेड’ ला ‘ए’ हे जोडलेल्या सफिक्सवरून लक्षात येतो. सध्या केवळ सेकंड टॉप व टॉपएंड व्हेरियंटमध्येच टियागो एएमटी उपलब्ध आहे. त्यामुळे यातील फीचरही सारखीच आहेत.

अंतरंग

टियागोला काळ्या रंगातील इंटीरिअर असून, हे प्रीमियम सेदान कारची आठवण करून देते. मॅन्युअल ट्रान्समिशन मॉडेप्रमाणेच टियागोलाही हार्मन कार्डनची इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. त्यामुळे उच्च दर्जाच्या म्युझिक सिस्टिमचा आनंद मिळतो. मोबाइल, यूएसबी, आयपॉड आदी गॅजेट्स कनेक्ट करता येतात. स्टिअरिंग माउंटेड ऑडियो-फोन कंट्रोल, ड्रायव्हर सीटची उंची कमी जास्त करण्याची सुविधा आहे. टियागोमध्ये अन्य कारच्या तुलनेत अधिक बूट स्पेस म्हणजे २४५ लिटर आहे.

इंजिन

टाटा मोटर्सने स्वत: विकसित केलेल रेव्हट्रॉन सीरिजमधील तीन सिलिंडरचे १.२ लिटरचे (१२०० सीसी) पेट्रोलचे ८५ पॉवर आणि ११४ न्यूटन मीटर (एनएम) कमाल टॉर्क मिळणारे इंजिन बसविले. यातील मोठा फरक म्हणजे फाइव्ह स्पीड गिअरबॉक्स हा ऑटोमॅटिकमध्ये दिला आहे. तसेच, गिअर शिफ्ट इंडिकेटर दिला आहे. त्यामुळे कार कोणत्या गिअरमध्ये आहे, हे चालविणाऱ्यास कळते.

पहिल्यांदाच एएमटी चालविणाऱ्यांसाठी

ऑटमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये एक कम्प्युरवर आधारित दिलेल्या सिस्टिमुळे गिअर बदलले जातात. यासाठी विशिष्ट आरपीएम (रेव्होल्यूशन्स पर मिनिट)वर गिअर रेशो बदलण्याचे निश्चित केले आहे. मॅन्युअल ट्रान्समिशनच्या कारमध्ये न्यूट्रलमधून फर्स्ट गिअरमध्ये आपल्याला हव्या तेवढय़ा पिकअपसाठी अ‍ॅक्सिलरेशन देता येते. पण,  प्रथमच एएमटी कार चालविणाऱ्यांना गिअर पडत असताना थोडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण कार एकदम पिकअप घेऊ शकते. त्यामुळेच एएमटीचा अंदाज येईपर्यंत कार चालविताना दक्षता घेणे आवश्यक आहे.

अनुभव

टियागोचे एएमटी बम्पर टू बम्पर ट्रॅफिकमध्ये कार उत्तम काम करते. एकदम पॉवरसाठी अ‍ॅक्सिलेट केल्यास गिअर बदलताना थोडासा धक्का जाणवतो. पण, हे ऑटोमॅटिक गिअर पडत असल्यामुळे होते. हायवेवर कार चालवितानाही आराम मिळतो. उत्तम मायलेजसाठी टॉप गिअर पडण्याच्या दृष्टीने कारचा प्रोगॅम निश्चित केला आहे. अर्थात, ओव्हरटेक करताना पॉवर कमी पडत असल्याचे जाणवल्यास अ‍ॅक्सिलरेशन वाढविल्यास कारचा गिअर लोअर रेशोमध्ये येतो. त्यामुळे पिकअपसाठी पॉवर मिळते.  एएमटी कार ही प्रामुख्याने ईज ऑफ ड्रायव्हिंगसाठी डिझाइन केली आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीच स्थिती यासाठी लक्षात घेऊन सिटी मोड टियागोला दिला आहे. तसेच, हायवे ड्रायव्हिंग वा घाटातील डायव्हिंगच्या वेळेस पॉवर कमी जाणवू नये यासाठी स्पोर्ट मोड दिला आहे. यामुळे आरपीएमची लेव्हल व गिअर रेशो चेंज होण्याचा प्रोग्रॅमही बदलतो. परिणामी पिकअप चांगला मिळतो. शहरातही काही ठिकाणी चढ असू शकतात वा घाटात वाहतुकीमुळे कार थांबवावी लागल्यास सरळ स्पोर्ट मोड निवडावा यामुळे कार पिकअप घेताना मागे जाणार नाही. तसेच, खबरदारी म्हणून हँडब्रेकचा वापर करवाच.

क्रीप फीचर

टाटा मोटर्सने क्रीप सुविधा एएमटीमध्ये दिली आहे. यामुळे कार पुढे वा मागे घेण्यासाठी मोड चेंज केल्यावर ब्रेक सोडल्यावर कार मागेपुढे आपोआप जाते. एएमटीमध्ये मॅन्युअल गिअर बदलण्याची सुविधाही दिली आहे. यामध्ये लिव्हर मॅन्युअल मोडमध्ये नेऊन गिअर बदलता येतात.

मायलेज किती?

ऑटोमॅटिक कारचे मायलेज खूपच कमी असते. मात्र, ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनच्या कारएवढेच जवळपास मायलेज मिळते. टियागो एएमटीचे एरआरएआय सर्टिफाइड मायलेज प्रति लिटर २३.८४ किमी आहे. शहरात आणि तेही वर्दळीच्या म्हणजे वाहतूक कोंडीएवढय़ा परिस्थितीत टियागो एएमटीचे मिळणारे मायलेजही समाधानकारक आहे. शहरात प्रति लिटर १५ किमीचे मायलेज मिळते. हायवेवर मायलेज प्रति लिटर २० ते २२ किमी मिळू शकते. टियागोचे मॅन्युअल मॉडेलचे मायलेजही जवळपास एवढेच आहे.

सुविधा

टियागोच्या एएमटी मॉडेलची किंमत मॅन्युअल मॉडेलपेक्षा केवळ ३५ हजार रुपयांनी जास्त आहे. तसेच, एबीएस, ईबीडी, एअरबॅग, कॉर्नर स्टॅबिलिटी प्रोग्रॅम ही सुरक्षेची फीचर आणि हार्मन कार्डन सिस्टिम, ईपीएस, ओआरव्हीएम्स, कूल ग्लोव्ह बॉक्स, सिटी-स्पोर्ट मोड, थ्री सिलिंडर इंजिन, मायलेज आदींनी युक्त असणारे टियागोचे एएमटीचे मॉडेल हे स्पर्धक कारच्या तुलनेत नक्कीच सरस व व्हॅल्यू फॉर मनी आहे. टियागोच्या एएमटी मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ४.८४ लाख रुपये एक्स-शोरूमपासून (प्रत्येक शहर व राज्यानुसार वेगवेगळी) सुरू होते. कारचा वापर हा प्रामुख्याने शहरातील ड्रायव्हिंसाठी अधिक असल्यास टियागो एएमटीचा विचार नक्कीच करता येऊ  शकतो.

ls.driveit@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 3:50 am

Web Title: automatic tata tiago amt model review
Next Stories
1 टॉप गीअर : सुझुकी जिक्सर एसएफ
2 खडबडीत रस्त्यांवरही लक्झरी प्रवास!
3 टॉप गीअर : अ‍ॅक्टिव्हा १२५
Just Now!
X