’ माझे बजेट साडेतीन लाख रुपये आहे. रेनॉची क्विड ही कार कशी आहे. ती घेणे योग्य ठरेल का? कृपया सांगा.
– कचरू पाटील, वडगाव
’ रेनॉ क्विड ही तशी वजनाने हलकी गाडी आहे. हायवेला चांगली पळते. या गाडीचे टॉप मॉडेल तुम्हाला किमान साडेतीन लाखांपर्यंत मिळू शकेल.
’ आमच्याकडे मी एकटाच कमावणारा आहे. मला गाडी घ्यायची आहे. आíथकदृष्ट्या परवडणारी कोणती गाडी आहे. टाटा नॅनो की मारुती वॅगन आर. कृपया सांगा.
– सिद्धेश वाचासिद्ध
’ गाडी घेताना प्रथमत मारुती वॅगन आरचाच विचार करा. ही गाडी उत्तम आहे. तसेच या गाडीचे बेसिक मॉडेल तुम्हाला परवडण्याजोगे आहे. वाहनकर्जे हल्ली स्वस्तात उपलब्ध असतात. त्यामुळे तुमच्या खर्चाचा ताळेबंद मांडून मगच गाडी घेण्याचा विचार करा. गरजेसाठी गाडी घेणे केव्हाही चांगलेच.
’ आमचे कुटुंब मोठे आहे. दरवर्षी आम्ही कुठे ना कुठे तरी पिकनिकला जातोच. त्यामुळे गाडी घेणे गरजेचे आहे. संपूर्ण कुटुंब सामावू शकेल, अशी कोणती गाडी आहे. तवेरा किंवा एन्जॉय या गाड्या कशा आहेत.
– संदीप आरोसकर, नवी मुंबई
’ तुमच्या कुटुंबाच्या आकारानुसार तुम्ही गाडी घेण्याच्या विचारात असाल तर मी प्रथमत तुम्हाला इनोव्हा घेण्याचा सल्ला देईन. एन्जॉय ही माझी सेकंड चॉइस असेल. इनोव्हा गाडीचे इंजिन दणकट आहे. शिवाय ते कितीही वजन कॅरी करू शकते. तसेच कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर ही गाडी व्यवस्थित धावू शकते.
’ मला गाड्यांची फारशी माहिती नाही. परंतु मला गाडी घ्यायची आहे. माझे मित्र मला मारुतीचेच नाव सुचवतात. काय करू.
-सचिन गावंडे, सटाणा
’ मारुती हा ब्रँड आपल्या देशात खूप जुना आणि विश्वासू आहे. त्यामुळे तुम्ही मारुतीच्या गाडीचा विचार करायला हरकत नाही. तुम्ही मारुतीची अल्टो के10 ही गाडी घ्या. तुमच्या बजेटात बसणारी आहे.
’ मिहद्रा केयूव्ही १०० ही गाडी कशी आहे.
– मिलिंद ढोमसे
’ मिहद्राच्या गाड्या डिझेल इंजिनसाठी जास्त ओळखल्या जातात. केयूव्ही१०० ही गाडीही चांगली आहे. तिचा मार्केट रिपोर्टही चांगला आहे. घ्यायला हरकत नाही.