23 February 2019

News Flash

कोणती कार घेऊ?

बॅटरी चार्जिग अल्टरनेटर वायर किंवा अल्टरनेटरमध्ये फॉल्ट असू शकतो.

मी नुकताच चारचाकी चालवायला शिकलो आहे. अ‍ॅटोमॅटिक किंवा एएमटी चारआसनी कार घेण्याचा विचार करत आहे. माझा प्रवास प्रत्येक महिन्याला १०० किमी आहे. तो वापरही शहरात आहे. त्यामुळे कोणती कार घेऊ याबाबत मार्गदर्शन करा.

नीलेश कंधारकर, पुणे

अल्टो के १० एएमटी कार घेण्याचा पर्याय मी तुम्हाला सुचवेन. ही अतिशय उत्तम कार आहे. मायलेज उत्तम आहे. कमी वापरासाठी खरोखरच ती अतिशय योग्य अशी कार आहे.

मी ३० ऑक्टोबर २०१६ ला फोर्ड फिगो ट्रेन्ड पेट्रोल घेतली आहे. मात्र ती चालू करण्यामध्ये ३ ते ४ वेळा समस्या आली. त्यानंतर शोरूममध्ये गेल्यानंतर बॅटरी बदलून देण्यात आली. त्यानंतर गाडी २ ते ३ महिने व्यवस्थित सुरू होती. मात्र त्यानंतरही गाडी सुरू न होण्याची समस्या येत आहे. कृपया मार्गदर्शन करा.

प्रवीण पवार

बॅटरी चार्जिग अल्टरनेटर वायर किंवा अल्टरनेटरमध्ये फॉल्ट असू शकतो. किंवा गाडी बंद पडल्यास पूर्ण इलेक्ट्रिक चेकअप करून घ्या.

माझे बजेट १० ते १२ लाख रुपये आहे. मासिक प्रवास १२०० किमी आहे. कृपया माझ्या बजेटमध्ये बसणारी आणि आरामदायी अशी कोणती कार घ्यावी याबाबत मार्गदर्शन करा.

राजेंद्र तुपे

तुम्ही वेर्ना पेट्रोल घ्यावी. ही उत्तम मायलेज देणारी गाडी असून, मेन्टेनन्सला देखील छान आहे.

माजी अल्टो एएक्स आय (एप्रिल २०११ मध्ये घेतली असून, प्रवास फक्त १५ हजार किमी) विकून माझ्या मित्राची ह्य़ुंदाई इऑन डिलाइट (ऑक्टोबर २०१३ मध्ये घेतली असून, प्रवास फक्त ५ हजार किमी) २ लाख रुपयांमध्ये घेऊ का. का आहे तीच अल्टो वापरू. माझी अल्टो कितीला विकली जावी, असे आपल्याला वाटते. कृपया मार्गदर्शन करा.

– o्रीकांत महाजन, घाटकोपर

इऑन ही अल्टोपेक्षा आरामदायी कार आहे. तिची कंडिशन पाहून ती तुम्ही खरेदी करू शकता. आणि आहे ती अल्टो १.५० लाख रुपयांना विकू शकता.

सर मला नवीन डिझायर डिझेल एज्स गाडीविषयी माहिती द्या. मासिक प्रवास १५०० किमी आहे. पेट्रोल बलेनो व डिझेल डिझायर यापैकी चांगली कार कोणती हे कृपया सुचवा.

विनायक मोरे

तुमचा प्रवास १५०० किमी असेल तर नक्कीच तुम्ही डिझेल डिझायर घ्यावी. ९ लाखात मिळू शकेल. आणि उत्तम क्वालिटी हवी असेल तर तुम्ही फोक्सवॅगन अ‍ॅमियो डीएसजी टीडीआय घ्यावी.

या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com

First Published on November 10, 2017 2:04 am

Web Title: car buying advice 6