’ सर, मला मारुतीची इको ही गाडी घ्यायची आहे. आमच्या कुटुंबात आम्ही सात जण आहोत. ही गाडी घेणे योग्य ठरेल काय. वर्षांतून दोन-तीनदा गावी जावे लागते.
– सुहास वरखेडे, ठाणे
’ मोठय़ा कुटुंबासाठी ही गाडी चांगली आहे. परंतु माझ्या मते तुम्ही या गाडीऐवजी शेवरोले एन्जॉय किंवा महिंद्राची टीयूव्ही या गाडय़ांचा विचार करावा. कारण इकोपेक्षा या गाडय़ा नक्कीच दणकट आहेत. तसेच त्या ऑफ रोडही चांगल्या चालू शकतात.
’ मला मारुतीची व्ॉगन आर घ्यायची आहे. प्रथमच मी गाडी घेणार आहे. मार्गदर्शन करा.
– संकेत शिवहरे, नांदेड
’ व्ॉगन आर ही गाडी चांगलीच आहे. आता तिचे ऑटोमॅटिक व्हर्जनही आले आहे. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्तपणे ही गाडी घ्या. गाडी चालवायलाही सोपी आहे आणि आतून गाडी प्रशस्तही आहे.
’ महिंद्राची टीयूव्ही ही गाडी कशी आहे. मला ती घ्यायची आहे.
– रामदास घारे, पुणे
’ टीयूव्ही ही एक उपयुक्त गाडी आहे. महिंद्राच्या सर्वच गाडय़ा दणकट असतात, तशीच ही आहे. तसेच या गाडीतून पाच ते सात जण आरामात प्रवास करू शकतात. तेव्हा ही गाडी तुमच्या बजेटात बसत असेल तर घ्यायला काहीच हरकत नाही.
’ माझे रोजचे ड्रायव्हिंग १०० किमी असेल. माझे बजेट पाच ते सहा लाख रुपये आहे. व्ॉगन आर विथ एजीएस ही गाडी घेण्याचा माझा विचार आहे. तुमचा सल्ला काय.
– डॉ. जयदीप साळी
’ कमी किमतीत ऑटोगीअर गाडी म्हणजे सेलेरिओ किंवा मग व्ॉगन आर. या दोन्ही गाडय़ा एजीएसवरही उत्तम मायलेज देतात. साधारणत १८ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज मिळतो. परंतु तुम्ही जर एक-दोन लाख रुपये जास्त टाकत असाल तर मी तुम्हाला बलेनो ही मारुतीचीच ऑटोमॅटिक गाडी घेण्याचा सल्ला देईन. परंतु कमीतकमी किमतीत उत्तम कार म्हणजे व्ॉगन आर हीच होय.
या सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com