पावसाळ्यामुळे तीव्र उन्हापासून सुटका होत असली तरी, गेल्या काही वर्षांमध्ये कोसळणारा पाऊस आणि पूर या दोन गोष्टी भारतात चिंतेच्या बनल्या आहेत. यामुळे वाहनांची मोठी हानी होते. तुमच्या भागात पाणी साठत असेल तर पुढील गोष्टींची विशेष काळजी घ्या; जेणेकरून पाण्यात बुडल्याने गाडीचे इंजिन बंद पडणं आणि त्यामुळे होणारी संभाव्य हानी टाळता येईल.

  • मोकळ्यावर पार्क केलेली आणि पाण्यात बुडालेली गाडी कधीही चालू करू नका. त्याऐवजी गॅरेजमध्ये फोन करून आपली गाडी पाण्यात बुडाल्याचं सांगा आणि ती चालू न करता गॅरेजपर्यंत ‘टो’ करून नेण्याची सोय करा.
  • बेसमेण्टमध्ये उभी असलेली आणि पाण्यात बुडालेली गाडी कधीही चालू करू नका. शक्य तितक्या तातडीने बॅटरी टर्मिनल्स काढून घ्या आणि मदतीसाठी गॅरेजमध्ये फोन करा.
  • तुमच्या गाडीला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (एटी) असेल तर सपाट पृष्ठभागावर गाडी टो केली जाईल याची खात्री करा. ते शक्य नसेल तर गाडी अशा तऱ्हेने उचलली पाहिजे जेणेकरून पुढची चाकं किंवा ड्रायव्हिंग व्हील्स जमिनीपासून उचललेली असावीत. असं केलं नाही तर एटी गिअर बॉक्सची हानी होण्याची शक्यता असते.
  • दुसरी एखादी गाडी पाण्यातून पुढे जाऊ शकत असेल तर आपली का नाही, असा विचारही करू नका. गाडीच्या प्रत्येक मॉडेलमधलं फिल्टर हे वेगवेगळं असतं. या फिल्टरमध्ये पाणी गेल्याने इंजिन बंद पडतं. पाणी साठलेल्या भागात गाडी बंद पडली तर ती चालू करू नका. गॅरेजच्या हेल्पलाइनला फोन करून मदत मागवा आणि आपल्या विमा कंपनीलाही कळवा.

मुसळधार पाऊस किंवा पूर हे मानवी आवाक्याच्या बाहेरील गोष्टी आहेत. र्सवकष वाहन विमा योजना घेऊन या संभाव्य आर्थिक नुकसानीपासून आपण वाचू शकतो. असं विमा संरक्षण नसल्यास, गाडी दुरुस्त करणं खिशासाठी खूप खर्चीक ठरू शकतं. अत्यंत कमी किमतीत चालू विमा योजनेबरोबरच अतिरिक्त विमा संरक्षण घेऊन आपल्या गाडीला जास्तीचं संरक्षण प्रदान करता येतं. इंजिन संरक्षक/हायड्रोस्टॅटिक लॉक कव्हरसारखं अतिरिक्त संरक्षण घेऊन पाण्यामुळे इंजिनच्या नादुरुस्तीमुळे होणारं आर्थिक नुकसान टाळता येतं.

गाडीचं नुकसान झाल्यास तातडीने आपल्या विमा कंपनीला कळवावं, जेणेकरून पुढे होणारं आणखी नुकसान टाळता येतं. त्याचबरोबर नजीकच्या वर्कशॉपध्ये दुरुस्तीसाठी वाहन घेऊन जावं. विमा कंपनीकडून नजिकच्या वर्कशॉप्सची यादी मिळवता येते. अशा कठीणप्रसंगी आर्थिक पाठिंबा देण्याचं काम केवळ विमा कंपनीच करते. त्यामुळे वाहन तसंच इतर संपत्तीच्या विम्यासाठी संपूर्ण माहिती करून घेऊनच विमा कंपनीची निवड करावी.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जबाबदारीने आणि सावधपणे ड्रायव्हिंग करा आणि पावसाळ्याची मजा लुटा!

 – के. जी. कृष्णमूर्ती राव, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड