* मला केयूव्ही१०० वा मारुती इग्निस यांपैकी एका गाडीची निवड करायची आहे. माझे महिन्याचे ड्रायव्हिंग ८०० किमी असून बजेट सात लाख रुपये आहे.

– विवेक झिंगरे

* तुम्ही नक्कीच मारुती इग्निस पेट्रोल टॉप मॉडेल ऑटोमॅटिक गाडी घ्यावी. ही अतिशय उत्तम आणि आरामदायी गाडी आहे.

* मला डिझेल गाडय़ांपैकी टाटा झेस्ट, होंडा अमेझ, स्विफ्ट डिझायर, बलेनो पॉवर प्लस, एक्सेंट या गाडय़ा आवडतात. अंदाजे ३०० किमीचा माझा मासिक प्रवास आहे. कुटुंबात आम्ही चौघे आहोत. कोणती गाडी घेणे योग्य ठरेल.

– भिमराव फुंडे

* तुम्ही फोर्ड इकोस्पोर्ट डिझेल गाडी घ्यावी. या गाडीचा मायलेज २२ किमी प्रतिलिटर एवढा आहे. आणि परफॉर्मन्स चांगला आहे. तुम्हाला ही गाडी फारच योग्य ठरेल. परंतु बजेट कमी असेल तर टाटा झेस्ट तुमच्यासाठी उत्तम ठरेल.

* मी विद्यार्थी असून वडिलांसाठी मला गाडी सुचवा. आमचे बजेट साडेतीन लाखांच्या आसपास आहे. गाडीचा वापर फारच कमी असेल. क्विड, टियागो, अल्टो, ईऑन, डॅटसन गो यांपैकी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल.

– विनायक कदम, निगडी

* तुम्ही तुमचे बजेट थोडे वाढवून ह्य़ुंडाई ईऑन ही गाडी घ्या. ही गाडी जास्त कम्फर्टेबल आहे. मेन्टेनन्स वर्षांला पाच-सहा हजारांचा असेल. आणि इन्शुरन्स १२ हजार रुपयांचा असेल.

* सर, मला कार घ्यायची आहे. माझे मासिक ड्रायव्हिंग सहा हजार किमी आहे. माझे बजेट सात-आठ लाख रुपये आहे. मी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल.

– संदेश भोसले

* तुमचे मासिक ड्रायव्हिंग सहा हजार किमी असेल तर तुम्ही शक्यतो पेट्रोल कार घेऊ नका. तुम्हाला घ्यायची असेल तर होंडा सिटी ही गाडी घ्यावी. हिला पर्याय नाही.

* मला लक्झरियस स्मॉल कार हवी आहे. मारुती इग्निस, फोक्सव्ॉगन पोलो, होंडा ब्रिओ, ह्य़ुंडाई ग्रँड आय१० यांपैकी कोणती चांगली आहे.

– यशवंत तोरो

* लक्झरियस स्मॉल कार सेग्मेंटमध्ये इग्निस चांगली आहे. परंतु या गाडीसाठी वेटिंग पीरियड जास्त असू शकेल. तुमच्यापुढे फोक्सव्ॉगन पोलोचाही पर्याय खुला आहे.

* माझ्याकडे व्हिटारा ब्रेझा ही गाडी आहे. कंपनीने या गाडीचा मायलेज २६ किमी प्रतिलिटर असा असल्याचा दावा केला आहे. परंतु प्रत्यक्षात मला १८ किमीचाच मायलेज मिळाला. हे कसे शक्य आहे.

– रोहित पाटील

* मारुती नेहमीच सरळसोट मोकळ्या रस्त्यावरील ऑप्टिमम मायलेज देत असते. तसेच त्यासाठी ६० किमी प्रतितास असा स्थिर वेगही असावा लागतो. त्यामुळे मायलेज चांगला मिळतो. त्यामुळे तुम्ही या सर्व अटींचे पालन केले तर तुम्हालाही २५ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज मिळू शकेल.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com