दुचाकीवर मागे बसणाऱ्या सहप्रवाशालाही आता हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. या सक्तीमागे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा असला तरी त्याकडे अनेक जण पूर्वग्रहदूषित नजरेने पाहतात. त्यामुळे या चांगल्या निर्णयाला नाक मुरडले जात आहे. परंतु हा निर्णय काही एका रात्रीत घेण्यात आलेला नाही, तर त्यामागे कायद्याचे कवच आहे. या हेल्मेटसक्तीला पायदळी तुडवू पाहणाऱ्यांविरोधात सध्या वाहतूक पोलिसांतर्फे मोठी मोहीम सुरू आहे..

दुचाकीस्वारांना हेल्मेटची सक्ती आधीपासूनच केली आहे. मोटार वाहन कायद्यात तसे स्पष्टच म्हटले आहे. मात्र, हेल्मेटच्या सक्तीला कोणीही जुमानत नव्हते. म्हणूनच यंदापासून या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्यात आली आहे. नियम तोडणाऱ्यांकडून जबर दंड वसूल करण्यात येत आहे. आता दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्या सहप्रवाशाच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी पाऊल टाकले आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून सहप्रवाशालाही हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. वस्तुत या नियमाचेही काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. मात्र, यातूनही पळवाटा शोधल्या जातात. कोणतेही कारण देऊन दंडातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ही सक्ती आपल्याच हितासाठी आहे, याची जाणीव अद्याप तरी होताना दिसत नाही.
हेल्मेटची सक्ती करण्यामागे दुचाकीस्वाराच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याच्या कलम १२९ अन्वये हेल्मेट म्हणजे दुचाकीवरून जाताना स्वसंरक्षणार्थ परिधान केलेले शिरोवेष्टन होय. मोटारसायकल चालवणाऱ्या व्यक्तीने तसेच मोटारसायकलवरून सहप्रवास करणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट घालणे अनिवार्य आहे. हेल्मेटही इंडियन स्टॅण्डर्ड ब्युरोने प्रमाणित केलेले असावे, असे या नियमात म्हटले आहे. हा कायदा सर्वाना समान लागू आहे तसेच संबंधित राज्य सरकारे या कलमाच्या अंमलबजावणीतून योग्य वाटेल असा नियम तयार करून सूट देऊ शकते.
हेल्मेट कसे हवे..
* हेल्मेटची निर्मिती अशी असायला हवी की ते घातल्यावर दुचाकीस्वाराला सुरक्षित वाटायला हवे. दुचाकीस्वाराला किंवा त्याच्या मागे बसणाऱ्याला अपघात झाल्यास त्या व्यक्तींचा दुखापतीपासून वाजवी स्वरूपात बचाव झाला पाहिजे.
* हेल्मेट परिधान करणाऱ्याच्या डोक्याला सुरक्षितपणे स्ट्रॅप किंवा हेल्मेटवर लावलेल्या बांधण्याच्या इतर साधनाद्वारे घट्ट बांधलेले असावे .
* केंद्र सरकारच्या केंद्रीय मोटार वाहन नियम १३८च्या उपनियम फ प्रमाणे दुचाकी खरेदीच्या वेळेस संबधित दुचाकी वाहनाच्या उत्पादकाने हेल्मेट ग्राहकाला देणे गरजेचे आहे. संबंधित हेल्मेट भारतीय मानक ब्युरोच्या मानकाप्रमाणे मान्यताप्राप्त असावे. परंतु हा नियम जर खरेदीदार कलम १२९ मध्ये वर्णन केल्याप्रमाणे अपवादात मोडत असेल तर अशा खरेदीदारास वाहनाच्या उत्पादकाने हेल्मेट पुरवठा करण्याची गरज नाही.
* सहप्रवासी कोणीही असो, महिला, लहान मूल, वृद्ध महिला अथवा पुरूष, तरुण या सर्वाना हेल्मेट परिधान करणे गरजेचेच आहे.
* हेल्मेटची रचना अशी असते की जर एखादा दुचाकीस्वार अपघातात सापडला तर त्याला कमीत कमी इजा व्हावी. मोटारसायकलच्या अपघातांच्या ८० टक्के अपघातांमध्ये गंभीर जखम किंवा अपमृत्यूची शक्यता असते. परंतु हेल्मेट घालणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत अपघाताची शक्यता २९ टक्केने कमी होते. बाइक अपघातांमध्ये हेल्मेट घातल्याने डोके तसेच मेंदूला दुखापत होण्याचे प्रमाण कमी होते.
* जेव्हा एखादी कार बाइकला ओव्हरटेक करत असेल तर अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता जास्त असते. असे अपघात बऱ्याचदा कारचा वेग ४० किलोमीटर प्रति तासपेक्षा ही कमी वेगात असतानादेखील होतात. जरी अपघातग्रस्त वाहनांचा वेग कमी असला तरी होणाऱ्या जखमा किंवा अपमृत्यू यांचे प्रमाण खूप असते. बरेच अपघात घरापासून अगदी जवळ घडतात.
* रात्रीच्या वेळेस घडणारे मोटारसायकल अपघात वीकेण्डच्या वेळेस अतिवेगाने दुचाकी हाकताना घडतात, या प्रकारच्या अपघातात वाहनचालकाने अतिरिक्त मद्यपान केलेले असते. या दोन प्रकारच्या अपघातांमध्ये ७५ टक्के मोटारसायकल अपघात होतात. जेव्हा अपघात घडतो तेव्हा मोटारसायकलस्वाराचे डोके जोराने रस्त्यावर आदळते. अशा वेळेस जर चालकाने योग्य प्रकारचे हेल्मेट योग्य पद्धतीने बांधलेले असेल तर त्याच्या डोक्याचा आणि मेंदूचा बचाव होतो.
हेल्मेटमुळे बचाव कसा होतो..
* हेल्मेट घातल्याने बाइकस्वाराचे समोर बघण्याचे क्षेत्र अजिबात कमी होत नाही
* हेल्मेट घातलेले असताना ऐकू येते, तसेच आजूबाजूचे आवाज मात्र कमी होतात
* जेव्हा हेल्मेटधारी दुचाकीस्वार दुर्दैवाने अपघातात सापडतो त्यावेळी त्याच्या डोक्याचा बचाव होतो. डोक्यावरील आघात हेल्मेटच्या कुशनमुळे पचवला जाऊ शकतो.

Pile of Dead fish, Airoli creek
ऐरोली खाडीत मृत माशांचा खच….मच्छीमार हवालदिल; मासे का मरत आहेत ? 
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Crime against four for polluting Pavana river
पिंपरी : पवना नदी प्रदूषित करणाऱ्या चौघांवर गुन्हा
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!