शहरातील वाढत्या ट्रॅफिकमुळे शहरात राहणारी व्यक्ती पर्सनल मोबिलिटीसाठी पुन्हा स्कूटरकडे वळू लागली आहे. गेल्या काही महिन्यांत ऑटोमॅटिक स्कूटरने मोटरसायकलपेक्षा विक्री वाढीचा दर अधिक राहिला आहे. ऑटोमॅटिक स्कूटर म्हणजे महिलांनी वापरण्याची गाडी, असे समीकरण होते. मात्र, क्लच बदलण्याची कटकट नाही, आरमदायी प्रवास, लगेज कॅिरग आदींमुळे पुरुषही ऑटोमॅटिक स्कूटरचे ग्राहक बनू लागले आहेत. कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या बहुतेक स्कूटर या पुरुष व महिला ग्राहक दोघांनाही वापरता येतील, अशाच बनविण्यात आल्या आहेत. ऑटोमॅटिक स्कूटरमध्ये जपानी कंपन्या आघाडीवर असल्या तरीही भारतीय कंपन्यांकडून त्यांना टक्कर मिळत आहे.

पूर्वाश्रमीची हिरो-होंडा आता हिरो मोटोकॉर्पने मोठय़ा स्तरावर ऑटोमॅटिक स्कूटर सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे. हिरो मोटोकॉर्पने डय़ुएट ही ऑटोमॅटिक स्कूटर बाजारात आणली आहे. कंपनीच्या ऑटोमॅटिकच्या स्कूटर रेंजमध्ये प्लेजर व मायस्ट्रो आहेत. मात्र, होंडापासून विभक्त झाल्यावर हिरो मोटोकॉर्पने विकसित केलेली डय़ूएट ही स्कूटर आहे. त्यामुळे यास विशेष महत्त्व आहे. तरुण, मध्यमवयीन ग्राहकांना भावेल अशा पद्धतीने डय़ूएट स्कूटरची रचना करण्यावर कंपनीने भर दिला आहे.

स्कूटरला ८.३१ बीएचपीचे ११० सीसीचे फोर स्ट्रोक इंजिन बसविले आहे. यास व्हेरिमॅटिक ड्राइव्ह ट्रान्समिशन ऑटोमॅटिक क्लच दिला आहे. इंजिन स्मूथ असून, पिकअप चांगला आहे. प्रति लिटर ४५ किमी मायलेज मिळू शकते.

पुढील चाकास टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिला असून, मागील चाकास पारंपरिक सस्पेन्शन आहे. दोन्ही सस्पेन्शन चांगली आहेत. मोबाइल चाìजग पॉइंट, बूट लाइट, टय़ूबलेस टायर्स, सेमी डिजिटल ओडोमीटर, सíव्हस ट्रिप डय़ू मीटर आदी फीचर देण्यात आली आहेत. स्कूटरची बॉडी मेटल असून, क्रोमचाही वापर करण्यात आला आहे. तसेच, मोटरसायकल ग्राहकांना आकर्षति करण्यासाठी कंपनीने इंधन भरण्याची कॅप सीटच्या मागच्या बाजूस दिली असून, रिमोट पद्धतीने ते ऑपरेट होते. स्कूटरला पुढील व मागील टायर टय़ूबलेस दिले आहेत. स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी सीटच्या खाली असलेल्या डिकीत मोबाइल चाìजग पॉइंट दिला आहे. तसेच, ऑटो हेडलॅम्प ऑन फीचरही समाविष्ट करण्यात आले आहे.

दुचाकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील व मागील दोन्ही ब्रेक लावणे अपेक्षित असते. पण, प्रत्येकालाच याचे तंत्र जमेलच असे नाही. त्यामुळे उत्तम ब्रेकिंगसाठी इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम दिली आहे. यामुळे मागील ब्रेक दाबताच ही प्रणाली कार्यरत होऊन पुढील ब्रेक लागतो. यामुळे गाडीवर अधिक चांगली पकड मिळू शकते. स्कूटरला पारंपरिक पद्धतीचे व्हील दिले आहे. अर्थात, डिस्कब्रेक व मॅगव्हीलचा पर्याय कंपनीने दिलेला नाही. अर्थात, ११० सीसी सेगमेंटमध्ये असलेल्या अन्य स्कूटरनाही ही फीचर दिलेली नाहीत.

११० सीसी सेगमेंटमध्ये होंडा अ‍ॅक्टिव्हा ही सर्वाधिक मागणी असणारी स्कूटर आहे. गेल्या दशकाहून अधिक काळापासून या स्कूटरची विक्री होत आहे. हँडिलग, स्टाइल, कम्फर्ट, तंत्रज्ञान यांच्यामुळे या स्कूटरकडे ग्राहक आकर्षति होतात. पण, हिरो मोटोकॉर्पची डय़ुएट ही नवी असली तरीही ती चांगली आहे. त्यामुळे ११० सीसी सेगमेंटमधील ऑटोमॅटिक स्कूटर घेणाऱ्यांनी एकदा डय़ुएटची राइड घेऊन मग कोणती स्कूटर खरेदी करायची याचा निर्णय घ्यायला हरकत नाही.

obhide@gmail.com