मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कार निर्मात्या कंपन्या नवनवीन मॉडेल्स बाजारात आणत आहेत. ग्राहकांना यामुळे चांगले पर्याय मिळत असूनही कारची निवड करण्यासाठी काहीशी द्विधा मनस्थिती होत आहे. प्रिमियम हॅचबॅक श्रेणीमध्ये ह्युंदाई इलाईट आय२० ही कार गल्या काही वर्षांपासून बाजारात आहे. यामध्ये कंपनीने काहीसे बदल करत क्रॉससारखे मॉडेल बाजारात आणले होते. यानंतर होंडा या प्रसिद्ध कंपनीने त्यांच्या पूर्वीच्या जॅझ या कारला नवे रुपडे, नव्या सुविधा देत हुंदाईला स्पर्धा दिली. यामध्ये भारतीयांची आवड, गरज लक्षात घेऊन परवडणारी कार बनविणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीने आपले जुने बलेनो मॉडेलचे पूर्ण रुपडेच पालटून टाकत हॅचबॅक श्रेणीच्या स्पर्धेत उडी घेतली. या तिन्ही पर्यायांमुळे ग्राहक कोणती कार चांगली, कोणती सरासरी मायलेज देते याविषयी संभ्रमात पडत आहे. या तीनही कारविषयीची माहिती..

कार घेताना  ग्राहक सर्वात पहिला विचार इंजिन क्षमता आणि मायलेजचा करतो. इंजिन क्षमतेचा विचार केल्यास जॅझचे डिझेल इंजिन सर्वात शक्तीशाली आहे. १.५लिटर इनलाईन ४- सिलिंडर एवढी क्षमताअसून यानंतर हुंदाई आय२० चा क्रमांक लागतो. या कारचे इंजिन १.४ लिटर आणि बलेनोचे १.३ लिटर आहे. तर तिन्ही कारचे पेट्रोल इंजिन समान १.२ लिटर एवढे आहे. जॅझ आणि बलेनोमध्ये ऑटो ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. कंपन्यांच्या दाव्यानुसार बलेनो कार सर्वाधिक मायलेज देते. यानंतर जॅझ आणि आय२० चा क्रमांक लागतो.

रचनेचा विचार केल्यास बलेनो बाजी मारते. या कारची लांबी आणि रुंदी सर्वाधिक आहे. तर जॅझ उंच आहे. बलेनोचे वजन कमी करण्यात कंपनीला यश आल्याने कंपनी सार्वाधिक मायलेज मिळत असल्याचा दावा करत आहे. जॅझमध्ये मोकळी जागा(बूट स्पेस) सर्वाधिक आहे. तर ईलाईट आय२०ची इंधन टाकीची क्षमता सर्वाधिक म्हणजेच ४५ लिटर आहे. सुरक्षेच्या दृष्टीने बलेनो कार सरस ठरत असून तिच्या सर्व मॉडेलमध्ये एबीएस, इबीडी, आणि पुढे दोन एअरबॅगचा पर्याय उपलब्ध आहे. तर जॅझ आणि आय२० या कारमध्ये केवळ वरच्या मॉडेल्समध्ये हा पर्याय उपलब्ध आहे.

बा रचना :

आय२० अ‍ॅक्टीव्हमध्ये पुढील बंपर दोन रंगात दिला आहे. तसेच फॉग लॅम्प दिल्याने कारला स्पोर्टी लूक येतो. १६ इंचाचे अलॉय व्हील्स दिले आहेत. एलईडी लाइटच्या रचनेत प्रोजेक्टर लाइट दिली आहे. १६ इंचाचे अलॉय व्हील दिल्याने गाडीची उंची वाढली आहे.

अंतर्गत रचना :

ह्युंदाईच्या आय२० अ‍ॅक्टिव्हमध्येही प्रिमिअम श्रेणीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामध्ये २-डीआयएन म्युझिक सिस्टिम वापरण्यात आली असून ती १ जीबी पर्यंत डाटा साठवू शकते. एकावेळी आठ स्पीकर व दोन ट्वीटर वपरू शकतो. ब्लूटूथ, युएसबी आणि ऑक्स-इन कनेक्टिव्हीटी देण्यात आली आहे. मागील भागात एसी व्हेंट उपलब्ध आहे.

इंजिन:

ही कार पेट्रोल, डिझेल या दोन्ही प्रकारात उपलब्ध आहे. १.२ लीटर पेट्रोल इंजिन ८२ अश्वशक्तीची तर १.४ ल७ीटर डिझेल इंजिन (सीआरडीआय) ८९ अश्व़शक्ती एवढी ताकद प्रदान करते. डिझेल इंजिनला ६स्पीड गीअर बॉक्स व पेट्रोल इंजिनला ५स्पीड गीअर बॉक्स बसविण्यात आला आहे. अ‍ॅटो ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध नाही.

चालवणे आणि नियंत्रण

आय२० अ‍ॅक्टिव्ह मध्ये ह्युंदाईने वेगात असताना गाडीवरील नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. यामुळे महामार्गावर आणि शहरात गाडी चालविताना अडचण येत नाही. तसेच ६-स्पीड गीअरबॉक्स एकदम स्मूथ काम करतो. यामुळे गीअर बदलताना चालकाला त्रास होत नाही.

बा रचना :

मारूतीने बलेनोची रचना करताना त्यांची सर्वाधिक खपाची कार स्विफ्ट डोळ्यासमोर ठेवली आहे. बलेनोची पुढील रचना काहीशी स्विफ्टसारख़ी आहे. फक्त ऑडीसारखे दिवसाही चालू राहणारे डीआरएल एलईडी लाइट दिले आहेत. मागील बाजूला क्रोम आणि आकर्षक ब्रेक लाईट, पुढील बाजूने लांब बॉनेट व टपामुळे स्पोर्टी लूक येतो. ५/५५आर१५ रुंदीच्या टायरमुळे गाडी भारतीय रस्त्यांसाठी सोईस्कर आहे.

अंतर्गत रचना :

बलेनोला ग्राहकांच्या पसंतीस उतरविण्याचा चंग मारूती सुझुकीने बांधलेला असल्याचे एकंदरीत अंतर्गत रचनेवरून वाटते. यामध्येही स्विफ्टची झलक दिसून येत असून काहीसा बदल करण्यात आला आहे. वरच्या श्रेणीमध्ये चावीशिवाय प्रवेश, पुश स्टार्ट-स्टॉप, टचस्क्रीन, पार्किंग कॅमेरा, ब्लूटूथ आणि सर्वात महत्वाचा बदल म्हणजे अ‍ॅपल कारप्ले. आतील रचना करताना मोकळी जागाही पुरेसी ठेवण्यात आली आहे. उंच व्यक्तींचीही विशेष काळजी याते घेण्यात आली आहे. सीटची रचना काहीशी सुधारण्याची गरज आहे. एसीचा मागे पर्याय उपलब्ध नाही.

इंजिन:

बलेनो कार स्विफ्टपेक्षा वरच्या श्रेणातील असल्याने इंजिनही ताकदवान बनविले आहे. तसेच स्विफ्टपेक्षा १०० किलोने वजन कमी केले आहे. १.२लिटर पेट्रोल इंजिन ८४ अश्वशक्ती ताकद निर्माण करते. तर १.३ लिटर डिझेल इंजिन ७५ अश्वशक्ती ताकद देते. शहरातील ट्रॅफिकमध्ये सारखे गीअर बदलण्याची गरज पडत नाही. अ‍ॅटो ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध आहे.

चालवणे आणि नियंत्रण

बलेनो चालविताना सर्वाधिक सुरक्षित वाटते. रस्त्यावरील खड्डे, धक्के चांगल्याप्रकारे नियंत्रित केले जातात. वळणावर गाडी नियंत्रण सोडत नाही. स्टीअरिंग एकदम हलके येत असल्याने गाडी चालविण्याचा आनंद वाढतो. मारुतीने यावर खूप काम केल्याचे जाणवते.

कोणती कार का घ्यावी?

बलेनो :  शहरातील वापरासाठी, मध्यम महामार्गावर वापर, महिन्यात कमी वापर  असेल तर. कमी देखभाल खर्च, इंधन बाचविणारी, सर्वात स्वस्त

आय२० अ‍ॅक्टीव्ह : आकर्षक रचना, शहर आणि महामार्गावरील अधिक वापर, चालविण्यास सोपी आणि प्रवासास चांगली. मायलेजसाठी थोडी समस्या, महाग.

होंडा जॅझ: कूल आणि स्लीक रचना, आयव्हीटेक इंजिन, आतील जागा, शहरातील वापरास चांगली, जास्त काळासाठी वापरता येणारी कार