24 November 2017

News Flash

टॉप गीअर : टीव्हीएस ज्यूपिटर

टीव्हीएस मोटरने ऑटोमॅटिक स्कूटरमध्ये अपग्रेड व्हर्नज लाँच करण्यास सुरुवात केली आहे.

ओंकार भिडे | Updated: September 8, 2017 2:27 AM

आपल्याकडे सण-उत्सवांचा कालावधी सुरू होत आहे. त्यासाठी वाहन कंपन्यांही सज्ज झाल्या असून त्यांनी वाहनांची नवी मॉडेल आणि जुन्या मॉडेलचे अपग्रेडेड व्हर्जन बाजारात लाँच करण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने अपग्रेड व्हर्जन ही कारची जास्त लाँच होतात. पण या वर्षी दुचाकींचीही लाँच होण्याची अपेक्षा आहे. टीव्हीएस मोटरने ऑटोमॅटिक स्कूटरमध्ये अपग्रेड व्हर्नज लाँच करण्यास सुरुवात केली आहे. टीव्हीएस काही मोटरसायकलसाठी ओळखली जात असली तरी गिअरलेस स्कूटरचे उत्पादन करणारी कंपनी अशीही एक ओळख आहे. कायनेटिक होंडानंतर गिअरलेस स्कूटरना विशेषत: महिलांसाठी स्कूटर बनवून नवी बाजारपेठ टीव्हीएसने निर्माण केली. कंपनीचा स्कूटी हा महिलांसाठीचा स्कूटर ब्रँड प्रसिद्ध असला तरी १०० ते ११० सीसीच्या सेगमेंटमधील गिअरलेस स्कूटरमध्येही कंपनीचे नाव घेतले जाते. देशात १०० ते ११० सीसीच्या स्कूटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळेच या सेगमेंटमधील स्पर्धाही तीव्र आहे. विकल्या जाणाऱ्या दहा गिअरलेस स्कूटरमध्ये सहा स्कूटर १०० ते ११० सीसीच्या असल्याचे उपलब्ध असणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. होंडा कंपनी १०० ते ११० सेगमेंटमध्ये आघाडीवर असली तरीही या सेगमेंटमध्ये दुसऱ्या स्थानावर टीव्हीएसनेही चांगले मार्केट मिळविले आहे.

सुरुवातीस टीव्हीएसने वेगो ही युनिसेक्स स्कूटर कंपनीने लाँच केली. पण अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ज्यूपिटर ही ऑटोमॅटिक स्कूटर लाँच केली. या स्कूटरला मिळालेले यश उत्तम आहे. तसेच कंपनीने या स्कूटरमध्ये ग्राहकांना अपेक्षित असणाऱ्या सर्व गोष्टी अर्थात फीचर देण्याचा प्रयत्न केला आहे.

टीव्हीएस ज्यूपिटर या गिअरलेस स्कूटरला ११० सीसीचे ७.८८ बीएचपीचे सीव्हीटी प्रकारचे इंजिन बसविले आहे.

ज्यूपिटर वजनास स्पर्धक स्कूटरपेक्षा एक किलोने कमी असून, वजन १०७ किलो आहे. त्यामुळेच मायलेजमध्ये नक्कीच फरक पडतो. प्रति लिटर ६२ किमी अंतर ही स्कूटर जाऊ शकते, असा दावा आहे. शहरातील वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन प्रति लिटर ४२ ते ४८ किमी मायलेज मिळू शकते. अर्थात, प्रत्येकाच्या चालविण्याची पद्धतीवरही ते अवलंबून आहे. ज्यूपिटर स्कूटरला पुढील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन दिले आहे आणि पारंपरिक सस्पेन्शनपेक्षा हे सस्पेन्शन नक्कीच चांगले आहे. त्यामुळे खडबडीत रस्त्यावर चालविणाऱ्या ज्यूपिटरच्या तुलनेत हादरे कमी जाणवतात. रस्त्यावर चांगली ग्रिप मिळण्यासाठी १२ इंचाचे रुंद टायर दिले आहेत. त्यामुळेच ज्यूपिटर हँडलिंगबाबत चांगली वाटते. ज्यूपिटरला डिस्कब्रेकचा पर्याय आहे. त्यामुळे ब्रेकिंगबाबत ज्यूपिटर चांगली वाटते.

टय़ूबलेस टायर्स, पासिंग लाइट, एक्स्टर्नल फ्यूएल रिफिलिंग, अलॉय व्हील्स, एलईडी टेल लाइट आदी फीचर देण्यात आली आहेत. शहरात तसेच मध्यम पल्ल्याच्या रायडिंगसाठी टीव्हीएस ज्यूपिटर चांगली वाटते. इंजिन सीव्हीटी प्रकारचे असून, स्मूथ आहे. पासिंग लाइटचे दिलेले फीचर विशेषत: हायवेवर उपयोगी पडू शकते. स्कूटरची लेगस्पेस मोठी असून घरगुती वापराचा सिलिंडर आडवा ठेवून नेता येऊ  शकतो आणि हे एक उपयोगी वैशिष्टय़ म्हणावे लागेल. कंपनीने ज्यूपिटरची एकूण चार व्हर्जन लाँच केली आहेत. यातील ज्यूपिटर क्लासिक हे पूर्णपणे नवे मॉडेल आहे. यात डय़ूएल टोन सीटिंग कव्हर दिले असून यामुळे प्रीमियम फील येतो. तसेच विंड शिल्ड, पिरल रायडर ग्रॅबरेलला क्यूशन बॅकरेस्ट दिला आहे. तसेच पॉवर आणि इको मोड दिला आहे. एकूण स्कूटरकडे पाहिल्यावर एक एलिगंट व रेट्रो-क्लासिक लुक दिसतो. त्यामुळे थोडा प्रीमियम लुक आवडणाऱ्यांना हे मॉडेल नक्कीच आवडेल. एकूण फीचर, मायलेज व किंमत पाहता ज्यूपिटर नक्कीच आकर्षक वाटते.

obhide@gmail.com

First Published on September 8, 2017 2:27 am

Web Title: information on tvs jupiter