फियाट क्रायस्लर अॅटोमोबाइल्स इंडिया (एफसीए) इंडिया आता नव्या फियाट अॅव्हेंचुरा अर्बन क्रॉस कार ग्राहकांना देण्यास सज्ज झाली असून, सणासुदीच्या काळातच ग्राहकांना ही गाडी मिळणार आहे कंपनी एक ऑक्टोबरपासून ही गाडी ग्राहकांना देण्यास सुरुवात करणार आहे. खास लाँच किंमतीत म्हणजेच ६.८५ लाख रुपयांत (नवी दिल्ली, एक्स शो-रूम) ही नवीन स्टायलिश फियाट क्रॉस हॅच गाडी भारतीय रस्त्यांवर उतरणार आहे यासह भारतीय ग्राहकांना या वर्गातील सर्वाधिक परवडणारी डिझेल गाडीही कंपनीने ग्राहकांसाठी आणली आहे
टाटा मोटर्सतर्फे विशेष ऑफर
सणासुदीचा हंगाम लक्षात घेता टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी हर वीक दिवाली ही ऑफर आणली आहे. या ऑफरचा एक भाग म्हणून टाटा कार बुक करणाऱ्या सात ग्राहकांना प्रत्येकी दहा लाख रुपयांच्या बक्षिसाची संधी मिळणार आहे. गेल्या आठवडय़ापासून ही ऑफर सुरू झाली असून नव्याने दाखल झालेल्या टाटा टियागोसहित सर्वच प्रवासी वाहन श्रेणीसाठी ही ऑफर लागू राहणार आहे. हर वीक दिवाळी ऑफरमध्ये वाहन विमा मोफत दिला जाणार आहे. तसेच आपल्या प्रवासी वाहन ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि एक्स्चेंज प्रोग्रॅम्स टाटा मोटर्सतर्फे राबवण्यात येणार आहेत. सफारी स्टॉर्मवर एक लाख रुपयांपर्यंतचा लाभ असेल तर झेस्टच्या खरेदीवर २० हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 30, 2016 12:23 am