अल्टो आता नव्या रूपात

नवी दिल्ली : मध्यमवर्गीयांची लाडकी असलेली अल्टो८०० आता आणखी आकर्षक रूपात सादर झाली आहे. आकर्षक फ्रण्ट डिझाइन, ताज्या दमाची आंतरिक सजावट, उजळ रंग, उच्च इंधनबचत क्षमता आदी वैशिष्टय़ांसह अल्टो८०० आता रस्त्यावर धावताना दिसेल. नवीन अल्टो आता एक लिटर पेट्रोलमध्ये २४.७ किमी मायलेज देणार आहे. सीएनजी प्रकारांतील अल्टोचे मायलेज ३३.४४ किमी असेल. गाडीच्या बाहय़ लांबीमध्ये ३५ मिमीने वाढ करण्यात आली आहे. रिमोट कीलेस प्रवेश, रिअर बॉटल होल्डर आणि को-ड्रायव्हर साइडमॅप पॉकेट यांसारख्या स्मार्ट स्टोअरेज जागा अशा नवीन वैशिष्टय़ांचा नव्या अल्टोमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मोटोमॅक्स शायनर, इन्स्टा शाइन

मुंबई : मोटोमॅक्सतर्फे इन्स्टा शाइन आणि शायनर ही दोन नवी उत्पादने बाजारात आणली आहेत. या शायनर्समुळे तुमची बाइक झळाळून उठणार आहे. मोटोमॅक्स शायनर स्प्रेच्या स्वरूपात उपलब्ध असून त्याचा वापर प्लास्टिक, धातू, रबर, व्हिनिल, लेदर किंवा वुडन लॅमिनेट्स अशा कोणत्याही पृष्ठभागावर करता येऊ शकणार आहे. १०० मिलीच्या बाटलीची किंमत १२५ रुपये आहे. मोटोमॅक्स शायनर सहज स्प्रे करता येऊ शकेल आणि पुसताही येता येणार आहे. इन्स्टा शाइन पॉलिशमध्ये ठेवलेल्या स्पंजच्या स्वरूपात असते. याचा वापर मोटारसायकलची इंधनटाकी, डॅशबोर्ड, साइड लॅम्प, मडगार्ड, बम्पर्स व साइड मिर्स यांच्यासाठी करता येतो. याची किंमत २० रुपये आहे.