04 March 2021

News Flash

न्युट्रल व्ह्य़ू : चेंज? अच्छा है!

वाहनांच्या किमती वाढणार आहेत ते या क्षेत्रात लागू करण्यात येत असलेल्या नव्या नियमांमुळे.

सर्व काही योजनाबद्धतीने चालू राहिले तर वर्षभरानंतर, ऑक्टोबर २०१७ नंतर भारतीय बाजारपेठेत दाखल होणाऱ्या सर्व कार या सध्याच्या किमतीपेक्षा अधिक महागडय़ा असतील. वाहनांच्या किमती वाढणे हे कुणालाच रुचणार नाही. नाही खरेदीदाराला आणि नाही विक्रेत्याला. पण हे आता याबाबत लागू होणार नाही.

वाहनांच्या किमती वाढणार आहेत ते या क्षेत्रात लागू करण्यात येत असलेल्या नव्या नियमांमुळे. हे नियमही पुढील वर्षांत ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहेत. येऊ घातलेल्या नव्या कारमध्ये व्ह्यू पार्किंग सेंसर/कॅमेरा, अधिक वेग इशारा उपकरण आणि एअरबॅग हे अनिवार्य असावे, असा सरकारचा आदेशच आहे. चालकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या उपाययोजना आहेत.

जागतिक स्तरावर भारतीय कार या स्वस्त, माफक दरातील कार म्हणून ओळखल्या जातात. पण हीच गोष्ट जर सुरक्षिततेच्या बाबतीत असेल तर आपण त्याची तुलनाही जागतिक स्तरावरच केली पाहिजे. जगभरात मान्यता असलेली एनसीएपी पतमानांकन पद्धती येथेही आणण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर झीरो स्टार पतमानांकन कारना देण्याचीही गरज आहे. कारण आपल्याकडच्या अनेक कार या सुरक्षेच्या चाचण्यांमध्येच अनेकदा अपयशी ठरतात.

देशातील वाहन विक्रीबाबत सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने केलेल्या एका सर्वेक्षणानंतर भारतीय हे एअरबॅग असलेल्या कारला फारसे प्राधान्य देत नसल्याचे नमूद केले आहे. वाहनाची किंमत अधिक असो वा कमी हा कल कायम आहे. आपलं आयुष्य पणाला लागलं तरी चालेल पण पैसा वाचविला पाहिजे, अशीच काहीशी याबाबतची धारणा म्हणता येईल. ‘चमडी जाये पर दमडी ना जाये’ हीच भूमिका याबाबत अनेकांची असते.

तेव्हा लोक जेव्हा त्यांच्या भल्यासाठी असलेल्या गोष्टी करत नाहीत तेव्हा त्या लादल्या जातात. सुरक्षेबाबतही या उपाययोजना सरकारने अनिवार्य केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे वाहन उत्पादक कंपन्यांना आवश्यक ठरणार आहे. भारतातील रस्ते आणि वाहतुकीची सध्याची स्थिती अपघाताची संख्या वाढविणारी आहेच. त्यामुळे सेकंदाला कितीतरी बळी येथे जातात. मात्र अशा उपाययोजनांमुळे त्यांची संख्या निश्चितच कमी होण्यास हातभार लागेल. अशा उपाययोजना करताना सरकारने डिजिलॉकर या आणखी एका सोयीची ओळख करून दिली आहे. या मंचावर तुम्हाला वाहनविषयक विविध कागदपत्रे सोबत बाळगण्याची गरज नाही. क्लाउड बेस व्यासपीठावर ही सुविधा कार्यरत असेल. त्यासाठी कागदांची जंत्री बाळगण्याऐवजी केवळ एक मोबाइल फोन पुरेसा आहे. त्यामधील याविषयीच्या अ‍ॅपद्वारे सारे काही समाविष्ट केले जाईल. त्याचबरोबर कागदपत्रे गहाळ होण्याची वगैरे चिंताही नसेल.

pranavsonone@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 12:23 am

Web Title: loksatta neutral view 3
Next Stories
1 ऑटो न्यूज.. : फियाट अ‍ॅव्हेंच्युरा अर्बन क्रॉस
2 ऑटो न्यूज.. : मर्सडिीज बेन्झचे चाकणमध्ये प्रशिक्षण केंद्र
3 टेस्ट ड्राइव्ह : मस्त मस्टँग!
Just Now!
X