मनुष्य हा नेहमी वेगाला प्राधान्य देतो. आपल्याला सर्वच जलद करायचे असते. धावायचे, पोहायचे, उडायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहनही जलद चालवायचे असते. वेगाबाबत आपण खूपच क्रेझी असतो हे सांगणे सोपे आहे.

आपली पृथ्वीही १,६७० किलो मीटर प्रती तासाने फिरत असते. आणि आपणही त्याचा भाग असतो.

आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते काहीसे जुने आहे. १५ ऑक्टोबर १९९७ ही तारिख. तशी जुनी आहे; पण यानंतर सर्व तसेच राहिले नाही.

ळऌफरवळ ररउ ही माझी आवडती कार. या वाहनाबद्दल मला नितांत आदर आहे. कारण तिचा सर्वाधिक वेग आहे १,२२७ किलो मीटर प्रती तास. इतिहासात ही कार सध्या सर्वाधिक वेगवान म्हणून गणली जाते. तिच्या या वेगाचा विक्रम अमेरिकेच्या ब्लॅक रॉक डेझर्ट (नेवाडा) मध्ये नोंदला गेला आहे.

ही कार काही साधीसुधी कार नाही. तुम्ही खरेदी करू शकत नाही आणि मोकळ्या मार्गावर तर चालवूही शकत नाही. या कारबाबतची उल्लेखनीय वैशिष्टय़े बघा. ५४ फूट लांब, १२ फूट रुंदी आणि ७ फूट उंची आहे या कारची. तिचे वजन आहे १०.५ टन!

या कारला लागणारे इंधनही बघा. ५.५ लिटर इंधनात ती केवळ एक किलो मीटर अंतर कापते. दोन रोल्स रॉईस जेट इंजिनाद्वारे १,१०,००० बीएचपी तिचा ऊर्जा निर्गमन क्षमता आहे. म्हणजे सर्वसाधारण सेदान श्रेणीतील वाहनाच्या १,००० पट. यातील इंजिन साधारणपणे ब्रिटिश जेटमध्ये वापरले जाते.

अवघ्या ६ सेकंदात १,००० किलो मीटर प्रती तास तिला लागतात. सुपर सॉनिक विमानांमध्ये असलेले वेगाबाबतचे सारे या वाहनामध्ये आहे.

अभियांत्रिकी कलेसाठी या  THRSUT SSC ला सलामच ठोकला पाहिजे!

pranavsonone@gmail.com