• माझे दर आठवडय़ाला किमान ५० ते ८० किमी रनिंग असेल. चार आसनी गाडी घेण्यासाठी माझे बजेट दहा लाखांपर्यंतचे आहे. माझ्यासाठी बलेनो ही गाडी योग्य ठरेल का. मारुती सुझुकीचा विक्रीनंतरचा सपोर्ट कसा आहे, या गाडीसाठी. तुम्ही कोणती अन्य गाडी सुचवाल काय.

– ऋग्वेद रक्षित

  • मी तुम्हाला फोक्सव्ॉगन पोलो जीटी टीएसआय ही पेट्रोल मॉडेल गाडी घेण्याचा सल्ला देईन. तिला टबरेचाज्र्ड इंजिन असून ते ताकदवान आहे. तसेच तुम्हाला सात स्पीड डीएसजी ऑटो ट्रान्समिशनमध्ये ही गाडी मिळू शकेल, ज्यामुळे तुमचे ड्रायव्हिंग अधिक सुलभ होईल.
  • मला सेकंड हँड गाडी घ्यायची आहे. माझे बजेट पावणेदोन लाखांपर्यंत आहे. व्ॉगन आर किंवा अल्टो मिळू शकेल काय. आणि सेकंड हँड गाडी किती वर्षांपर्यंत वापरलेली चालते.

– प्रतीक कुमठेकर.

  • पावणेदोन लाखांत तुम्हाला नक्कीच व्ॉगन आर ही गाडी मिळू शकेल. परंतु तुम्ही थोडे बजेट वाढवून ह्य़ूंडाई आय१० ही गाडी घ्यावी. ही गाडी जास्त दणकट आहे आणि जास्त काळ टिकते.
  • मला पाच आसनी गाडी घ्यायची आहे. माझे ड्रायव्हिंग फारसे नसेल. फक्त गावी जाण्यायेण्यासाठी मला गाडी घ्यायची आहे. पेट्रोल गाडी चांगली की डिझेलवर चालणारी गाडी चांगली.

– योगेश साबळे

  • गाडीचा वापर जास्त नसेल तर पेट्रोल गाडी घ्यावी. त्यातल्या त्यात पाच आसनी आरामदायी गाडी म्हणजे फोर्ड फिगो आणि मारुती बलेनो. यापैकी कोणतीही गाडी तुम्हाला सहा लाखांपर्यंत मिळू शकेल.
  • मला महिंद्राची टीयूव्ही३०० ही गाडी खूप आवडते. ही गाडी कशी आहे, मला सांगाल का. मला सात आसनी गाडी घ्यायची आहे जी डिझेलवर चालणारी असेल आणि जिचा मायलेजही चांगला असेल.

– धनंजय पोटे, बोईसर

  • टीयूव्ही३०० ही सर्वोत्तम एसयूव्ही आहे जी तुम्हाला कमी किमतीत मिळू शकते. मी तुम्हाला ही गाडी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर चालणारी घेण्याचा सल्ला देईन. त्यामुळे तुम्हाला तणावमुक्त ड्रायव्हिंगचा अनुभव घेता येईल. तसेच तुम्हाला ही गाडी फक्त दहा लाखांपर्यंत मिळू शकेल.

या सदरासाठी प्रश्न पाठवा :  ls.driveit@gmail.com