जॅग्वार लॅण्ड रोव्हरने अलीकडेच सणासुदीच्या मुहूर्तावर त्यांच्या एफ-पेस या परफॉर्मन्स एसयूव्हीची किंमत जाहीर केली आहे. अलिशान एफ-पेस या एसयूव्हीची किंमत सुरू होईल ६८ लाख ४० हजार रुपयांपासून (एक्स शोरूम, दिल्ली). या गाडीच्या बुकिंगला सुरुवात झाली असून इच्छुक ऑनलाइनही एफ-पेसचे बुकिंग करू शकतात. अथवा जॅग्वारच्या देशभरातील २३ शोरूम्समध्येही या गाडीचे बुकिंग सुरू आहे. एफ-पेस २.०१ ते एफ-पेस ३.०१ अशा चार डिझेल व्हेरिएंटमध्ये ही एसयूव्ही उपलब्ध असून टॉप मॉडेलची किंमत एक कोटी १२ लाख ५५ हजार रुपये एवढी आहे.
ब्रिटिश स्पोर्ट्स कारमेकर अॅश्टन मार्टिन कंपनीने त्यांच्या डीबी मालिकेतील नवेकोरे डीबी११ हे मॉडेल नुकतेच मुंबईत लाँच केले आहे. तब्बल सव्वाचार कोटी रुपये किंमत असलेली ही स्पोर्ट्स कार भारतात पुढील वर्षांच्या सुरुवातीपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. डीबी११ ला टबरे व्ही१२ या शक्तिशाली इंजिनाची साथ लाभली आहे. अवघ्या ३.९ सेकंदांत ही गाडी शून्य ते १०० किमी प्रतितास एवढा वेग गाठू शकते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 4:37 am