03 June 2020

News Flash

टेस्ट ड्राइव्ह : मध्यमवर्गीयांची नवीन गाडी

भारतीयांची पहिली सवारी, अशा आशयाची जाहिरात सध्या एक कंपनी करीत आहे.

बजेट कार घेण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांना मारुती-८०० किंवा अल्टो या गाडय़ांपेक्षा काही तरी जास्त हवे असते. या काही तरी जास्तीच्या खात्यात मागील आसने आरामदायक, चांगला परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज या तीन गोष्टी हमखास असतात. रेनाँची नवीन क्विड या सगळ्या अपेक्षा पूर्ण करते. त्यामुळे ही गाडी मध्यमवर्गीयांची नवीन गाडी म्हणून नक्कीच कसोटीवर उतरू शकते.

भारतीयांची पहिली सवारी, अशा आशयाची जाहिरात सध्या एक कंपनी करीत आहे. दारात उभी असलेली लांबसडक गाडी हे कोणाचेही स्वप्न असले, तरीही सुरुवातीला गाडी घेताना छोटेखानी, आपल्या बििल्डगच्या किंवा घराच्या पाìकगमध्ये व्यवस्थित उभी राहील, अशी गाडी घेण्याकडेच लोकांचा ओढा जास्त असतो. त्यातही ही गाडी मायलेजच्या कसोटीवरही उत्तम उतरणारी असावी, ही अपेक्षा असते. या सगळ्या अपेक्षांवर मारुती-८०० ही गाडी अत्यंत खरी उतरत असल्याने त्या काळी ती लोकप्रिय झाली होती. दारात मारुती-८०० उभी असणे, हे त्या वेळी उंची लक्षण मानले जात होते. आता अशा छोटय़ा हॅचबॅक गाडय़ांना तोटा नसल्याने ऑटोमोबाइल कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पध्रेत नव्याने उतरलेली कंपनी म्हणजे रेनाँ! सुरुवातीला भारतातील मिहद्रा कंपनीला बरोबर घेत लोगान ही सेडान गाडी बाजारात आणणाऱ्या या कंपनीने त्यानंतर पल्स, डस्टर, स्काला अशा गाडय़ा बाजारात आणत चांगलीच स्पर्धा निर्माण केली. नुकतेच या कंपनीने रेनाँ क्विड या कंपनीचे नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. हे मॉडेल सर्वसाधारण मध्यमवर्गीयांसाठी अत्यंत उत्तम मॉडेल आहे.

बारूप

या श्रेणीतील कोणत्याही हॅचबॅक गाडीप्रमाणेच रेनाँ क्विड १ लिटर ही दिसायला छोटेखानी तरीही टुमदार गाडी आहे. याआधी बाजारात आलेल्या क्विडमध्ये आणि या गाडीत बाह्यरूपी फारसा फरक नाही. पण ही गाडी अधिक आकर्षक दिसावी, यासाठी कंपनीने गाडीवर ग्राफिक डिझाइन वगरे केले आहे. गाडी बसकी असली, तरी तिचा ग्राउंड क्लीअरन्स या श्रेणीतील गाडय़ांसाठी उत्तम आहे. किंबहुना या श्रेणीतील इतर कंपन्यांच्या गाडय़ांच्या ग्राउंड क्लीअरन्सपेक्षा रेनाँ क्विडचा ग्राउंड क्लीअरन्स चांगला असल्याचा दावा केला जातो. हा दावा काही अंशी खराही आहे. गाडीची रचना करताना स्पीड स्पोर्ट डिझाइनचा वापर केल्याने गाडीला स्पोर्टी लुक येतो. गाडीच्याच रंगाचे बंपर्स, इंग्रजी सी अक्षराप्रमाणे असलेले गाडीचे हेडलाइट्स या दोन्ही गोष्टी आकर्षक आहेत. विशेष लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे गाडीचे ग्रिल! या ग्रिलच्या रचनेमुळे गाडीला अत्यंत बोल्ड लुक मिळतो. उजवी-डावीकडे वळायचे सिग्नल इंडिकेटर्स गाडीच्या दरवाजावरही आहेत. त्याचप्रमाणे साइड मिररवरही हे इंडिकेटर्स दिले असल्याने गाडीला वेगळा लुक मिळतो. गाडीच्या दरवाजांना खालच्या बाजूला काळी पट्टी दिली आहे. या काळ्या पट्टीमुळे गाडीच्या स्पोर्टी लुकला अधिक उठाव येतो. गाडीचा मागचा भाग आणि रूफ रेल्स यांतही रेनाँने हा स्पोर्टी लुक जपला आहे. एकसंध एकच एक वायपर पावसाळ्यात कितपत पुरेसा ठरेल, याबाबत मात्र काहीशी शंका येते. पण गाडी दिसायला नक्कीच आकर्षक आहे.

अंतरंग

गाडीच्या इंटिरिअर्सचा आणि कम्फर्ट फीचर्सचा विचार करताना गाडीची किंमतही विचारात घ्यायला हवी. ही गाडी चार लाखांच्या आत उपलब्ध आहे. त्यामुळे गाडीचे अंतरंग अतिभपकेबाज नाही. तरीही मध्यमवर्गीयांच्या सर्वसामान्य अपेक्षांवर खरे उतरण्याचे काम गाडी चोख बजावते. पाच जणांसाठी असलेल्या या गाडीतील मागची तीन जणांसाठीची सीट आरामदायक आहे. या सीटवर तीन जण नीट बसू शकतात. गाडीचा डॅशबोर्ड डय़ुएल टोन आहे. तर डॅशबोर्डवरच सात इंचाचा मल्टिमीडिया डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याशिवाय पियानो फिनिश स्टिअिरग आणि डॅशबोर्डचा काही भागही गाडीचा देखणेपणा वाढवतो. ही गाडी ऑटो ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध आहे. त्या प्रकारात गाडीला गिअर ट्रान्समिशन डायल डॅशबोर्डवर देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन आसनांच्या मध्ये खूप जागा मिळते. गिअर असलेल्या मॉडेलमध्ये मात्र ती सोय नाही. तरीही बाटली किंवा ग्लास ठेवण्यासाठी जागा दिली आहे. गाडीच्या पुढच्या दोन खिडक्या पॉवर िवडो असल्या, तरी मागच्या खिडक्या खाली करण्यासाठी पूर्वी गाडय़ांमध्ये असायची तशीच प्रणाली देण्यात आली आहे. त्याशिवाय इतर वेळी चालकाच्या उजव्या हाताला दरवाजावर असलेले खिडक्या खाली-वर करण्याचे किंवा सेंट्रल लॉक करण्याचे नियंत्रण या गाडीत थेट डॅशबोर्डवर देण्यात आले आहे. ही अत्यंत चांगली सोय म्हणता येईल. गाडीत छोटा दिवा आहे, वातानुकूलन यंत्रणाही चांगली आहे. मागे बसलेल्या लोकांनाही थंड हवा सहज जाणवते.

अनुभव

रेनाँ क्विड १ लिटर ही गाडी चालवण्याचा अनुभव समाधानकारक आहे. ही गाडी मध्यमवर्गीय खिशाला अत्यंत परवडणारी असून परफॉर्मन्सच्या दृष्टीनेही उत्तम आहे. एक गोष्ट नमूद करायला हवी. गाडीचा सर्वाधिक वेग १३५ किमी प्रतितास सांगितला जात असला, तरी गाडी कमाल ८० ते ९० किमी प्रतितास या वेगानेच पळवावी. त्यापेक्षा जास्त वेग घेतल्यास गाडीला हादरे बसतात. मागील आसनांवर हे हादरे जास्त जाणवतात. चांगली बाब म्हणजे गाडीचा वेग नियंत्रणात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ते उत्तम आहे. गाडीत चालकासाठी दिलेली आणखी एक सोय म्हणजे गाडी चालू असताना गाडीच्या स्पीडोमीटर, फ्युएल इंडिकेटर वगरे डिस्प्लेवर एक ऊध्र्व किंवा अध दिशेला एक बाण दिसतो. हा बाण गिअर बदलण्याची गरज अधोरेखित करतो. म्हणजेच गाडी दुसऱ्या गिअरला असेल आणि ती तिसऱ्या गिअरमध्ये चालवण्याची गरज असेल, तर हा बाण ऊध्र्व दिशेला असतो. तसेच गाडी एका गिअरमध्ये असेल आणि अचानक वेग कमी झाल्याने गिअर उतरवण्याची गरज भासल्यास हा बाण खालच्या दिशेला दाखवला जातो. गाडीची इंधनक्षमता कमी असल्याने एकदा टाकी फुल केल्यानंतर गाडी ४०० ते ४५० किमी एवढे अंतर जाऊ शकते.

सुरक्षा आणि आराम

या गाडीच्या किमतीचा विचार केल्यास या गाडीत आरामदायक फीचर्स खूप कमी असतील, हे अध्याहृत आहे. तरीही पुढील दोन्ही खिडक्यांमध्ये पॉवर िवडोची सोय, पॉवर स्टिअिरग, रिमोट ट्रंक ओपनर, रिमोट फ्युएल लीड ओपनर, पेट्रोल कमी झाल्यास सूचना देणे, नॅव्हिगेशन सिस्टीम, मल्टिमीडिया डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्शन, लेदर स्टिअिरग, डिजिटल क्लॉक अशा काही सुविधा देण्यात आल्या आहेत. या गाडीत स्पीकर्स पुढील बाजूला असल्याने मागे बसणाऱ्यांना अनेकदा गाणी किंवा तत्सम प्रकार ऐकू येत नाहीत. मागच्यांसाठी आवाज वाढवल्यास पुढे बसणाऱ्या प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता असते. सुरक्षेच्या दृष्टीने सेंट्रल लॉकिंग, पॉवर डोअर लॉक्स, चाइल्ड सेफ्टी लॉक, फ्रंट आणि साइड इम्पॅक्ट बीम्स, क्रॅश सेन्सर्स, अ‍ॅण्टी थेफ्ट डिव्हाइस आदी गोष्टी देण्यात आल्या आहेत.

किंमत

गाडीची किंमत ३.८९ लाख एवढी आहे.

इंजिन आणि मायलेज

गाडी १ लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. या इंजिनची क्षमता ९९९ सीसी एवढी आहे. मारुती अल्टो के-१० किंवा डॅटसन रेडी गो या प्रतिस्पर्धी गाडय़ांच्या तुलनेत या गाडीचा टॉर्कही जास्त आहे. या श्रेणीतील गाडय़ांमध्ये सर्वात उत्तम म्हणजेच ९१एनएम एवढा टॉर्क ही गाडी देते. त्यामुळे ही गाडी चालवताना योग्य तो वेग घेऊ शकतो. कंपनीच्या मते ही गाडी शहरात १९.८९ किमी प्रतिलिटर आणि हायवेवर २३.०१ किमी प्रतिलिटर एवढा मायलेज देते. मात्र या गाडीच्या फ्युएल टँकची क्षमता केवळ २८ लिटर असून या श्रेणीतील गाडय़ांमध्ये ही क्षमता कमी आहे.

rohan.tillu@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2017 12:17 am

Web Title: renold new car kwid
Next Stories
1 टॉप गीअर : टीव्हीएसचा ‘व्हिक्टर’ नावाचा फिनिक्स
2 कोणती कार घेऊ?
3 हवीहवीशी हॅचबॅक
Just Now!
X