News Flash

फर्स्ट लूक : हिमालयाच्या कुशीत

बुलेट चालवणं हा कसा अगदी मर्दानी खेळ असल्यासारखं वाटतं.

 

शीर्षक वाचून जरा दचकलात ना.. दचकू नका, हे काही िहदी चित्रपटाचे मराठी नामांतर वगरे नाही. हिमालय म्हणजे प्रत्येकाच्या मनात एक कुतूहल असतंच. हिमालयाविषयी आपल्या प्रत्येकाला एक गूढ आकर्षण असतं. हिमालयाशी अनेक गोष्टी आपण जोडतो, म्हणजे हिमालयाएवढे आव्हान, विक्रमांचं एव्हरेस्ट, हिमालयाएवढे साहस वगरे वगरे.. तर तुमच्या लक्षात आलंय ना, काय म्हणायचंय मला ते.. हो अगदी बरोबर, हे हिमालय पुराण रॉयल एन्फील्ड हिमालयनचंच आहे..

बुलेट चालवणं हा कसा अगदी मर्दानी खेळ असल्यासारखं वाटतं. त्यामुळे बुलेट तुमच्याकडे असणं हा एक स्टेटस सिम्बॉल समजला जातो. आणि बुलेट म्हणजे रॉयल एन्फील्ड हेही समीकरण अगदी घट्ट आहेच. आता हे बुलेट पुराण इथेच थांबवून बुलेट आणि हिमालयाचा काय संबंध आहे हे विशद करतो. बुलेटचे निर्माते रॉयल एन्फील्डने बाजारात लाँच केलेल्या ‘हिमालयन’ या ‘अ‍ॅडव्हेंचर टुअरर बाइक’विषयी सांगण्यासाठी हा सर्व खटाटोप आहे.

‘हिमालयन’ या नावातच सर्व काही आहे. म्हणजे या मोटरसायकलचा जन्म कशासाठी झाला आहे, हे सांगायला नकोच. तिच्या नावातूनच कळतं ते. साहसाची आवड असलेल्या हार्डकोअर बायकर्ससाठी ‘हिमालयन’ म्हणजे अस्सल पर्वणी आहे, हे वेगळे सांगायची गरजच नाहीय. तुम्हाला अगदी कन्याकुमारीपासून काश्मीर गाठायचे असेल, बाय रोड आणि तेही बाइकने, तर बिनधास्तपणे ‘हिमालयन’ घ्या. तुम्हाला ऑन रोड, ऑफ रोड अशा दोन्ही ट्रॅकवर धुरळा उडवायचाय, तर बिनधास्तपणे ‘हिमालयन’ घ्या. तुम्हाला आडवाटेवरचं कोणतंही ठिकाण गाठायचंय, जिथे चारचाकी वाहन सहसा जात नाही, तर बिनधास्त ‘हिमालयन’ घ्या.. थोडक्यात काय तर तुम्ही ‘हिमालयन’ का टाळावी, अशी सांगण्यासारखी फार कमी कारणे तुमच्याकडे असतील, अशी तजवीजच रॉयल एन्फील्डवाल्यांनी करून ठेवलीय.

खास करून भारतासाठी तयार केलेली ही मोटरसायकल आहे. त्यात काही शंकाच नको. आपल्याकडच्या रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊनच या तब्बल ४०० सीसी इंजिनक्षमतेच्या गाडीची निर्मिती करण्यात आली आहे. हिची खासियत म्हणजे या गाडीचे इंजिन सिंगल सििलडर असून मेन्टेनन्सही फारसा नाही. त्यामुळे लाँग टूरबरोबरच तुम्ही ‘हिमालयन’चा दैनंदिन वापरही करू शकणार आहात.

roayal-enfiled-chart

विशेष काय..

एक तर जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाला निघता त्या वेळी तुमच्याकडे अचूक दिशादर्शन करणारं यंत्र असायला हवं. जे की हिमालयनमध्ये आहे. तसेच रात्री-बेरात्री तुम्ही एखाद्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावरून प्रवास करत असाल, किंवा कुठे एखाद्या दाट धुक्यातून प्रवास करत असाल तर तुम्हाला त्यातून वाट काढणं सुकर व्हावं यासाठी प्रखर प्रकाश पुरवणारे हझार्ड लाइट्स स्विचेस हिमालयनच्या दिमतीला आहेत. त्याचबरोबर तापमानाचे रीिडग करणारी यंत्रणा, तुम्ही कोणत्या गिअरमध्ये गाडी चालवत आहात हे दर्शवणारे गिअर इंडिकेटर, तुमचा अ‍ॅव्हरेज स्पीड किती आहे. तुम्हाला तुमच्या गंतव्य स्थानापर्यंत पाहोचायला आणखी किती पल्ला गाठायचा आहे, हे सर्व दाखवणारे इंडिकेटरही हिमालयनला आहेत. एन्फील्डच्या बहुतांश मॉडेल्समध्ये नसलेली एक बाब हिमालयनमध्ये आहे, आणि ती म्हणजे फ्यूएल इंडिकेटर. हिमालयनला मागील आणि पुढील चाकांना डिस्क ब्रेक उपलब्ध आहेत. तसेच हिमालयनसाठी रॉयल एन्फील्डने पाच हजार किमीपर्यंत सíव्हस आणि दहा हजार किमीपर्यंतच्या प्रवासानंतर ऑइल बदलवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बाबतीत हल्रे डेव्हिडसनलाही एन्फील्डने मागे टाकलंय. हल्रे डेव्हिडसनच्या गाडय़ांमध्ये आठ हजार किमी रिनग झाल्यानंतर ऑइल बदलावे लागते.

का घ्यावी..

खास अ‍ॅडव्हेंचर टूरसाठी तयार करण्यात आलेली हिमालयन ही भारतातील पहिलीच बाइक आहे. इंजिन नवीन असल्याने ज्यांना दूर साहसी मोहिमा काढण्याची हौस आहे, त्यांच्यासाठी ही बाइक सर्वोत्तम आहे.

किंमत :

  • एक लाख ५७ हजार ८२४ रुपये (एक्स शोरूम, मुंबई)

वॉरंटी :

  • एक वर्ष आणि दहा हजार किमी (जे आधी असेल ते ग्रा)

jaideep.bhopale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2017 12:15 am

Web Title: royal enfield himalayan
Next Stories
1 कोणती कार घेऊ?
2 टॉप गीअर : ऑफ रोड बाइक
3 परवडणाऱ्या गाडय़ा
Just Now!
X