24 November 2017

News Flash

‘सीटबेल्ट’ कशासाठी?

काही प्रमाणात अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी होईल.

चंद्रकांत दडस | Updated: September 8, 2017 2:28 AM

चारचाकी गाडीमध्ये अपघातसमयी आपल्याला दुखापत होऊ नये यासाठी सीटबेल्ट वापरणे आवश्यक असते. मात्र भारतीय मानसिकता सीटबेल्ट म्हणजे ‘गळ्यात उगाच लोढणे’ अशी असल्याने सीटबेल्ट वापरण्याकडे सहजरीत्या दुर्लक्ष केले जाते. फक्त सीटबेल्ट न बांधल्यामुळे प्रत्येक दिवशी अनेकांचा अपघातामध्ये नाहक बळी जातो. सीटबेल्ट वापरणे हा फक्त सरकारी नियम नसून ती आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. ही भावना प्रत्येकामध्ये निर्माण व्हायला हवी. तरच काही प्रमाणात अपघातांमध्ये होणारे मृत्यूंचे प्रमाण कमी होईल.

हल्लीच मला मंगलोरला भेट देण्याची संधी मिळाली. मला विमानतळावरून एका सात व्यक्तींसाठी योग्य आसनक्षमतेच्या टॅक्सीने पिक अप केले. मी मागील सीटवर बसलो व सवयीनुसार सीट बेल्ट ओढला आणि त्याचे बक्कल लावण्याच्या प्रयत्न केला. पण मला बक्कल काही सापडलेच नाही. बक्कलला अगदी व्यवस्थितपणे सीट कव्हरच्या खाली ठेवले गेले होते जे मागील सीटवरून स्पष्ट दिसत होते. टॅक्सीचालकाने मला सांगितले ‘सर, मागील सीटसाठी सीट बेल्टची गरज नाही. तपासणी फक्त पुढच्या सीटच्या बेल्टसाठी होते.’ मी त्याला निक्षून सांगितले की, ते माझ्या सुरक्षिततेसाठी असून कुणाच्याही अनुपालन तपासणीसाठी नाही. असे अनेक अनुभव मला सातत्याने येत असतात.

ऑक्टोबर येईस्तोवर, भारतात वितरित केल्या जाणाऱ्या सर्व नव्या मोटारगाडय़ा युरोप इतकेच अग्रणी सुरक्षा नियम साध्य करतील. त्या एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग प्रणाली आणि डिझाइन नावीन्यांसह आणल्या जातील, कारण की ऑटोमोबाइल कंपन्या मोटारगाडय़ांना अत्यधिक जड किंवा कमी कार्यक्षम न बनू देता अधिक सुरक्षित बनवू पाहत आहेत. जेव्हा की नियमनांनुसार सध्याच्या कार मॉडेल्सना ऑक्टोबर २०१९ पर्यंत परवानगी देत आहेत, कंपन्यांनी काही अस्तित्वातील मॉडेल्सना आधीच अपग्रेड केले आहे आणि त्यांच्या अवतरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या समस्त मॉडेल्सना निर्धारित तारखेच्या आधीच पूर्ण करण्याच्या वाटेवर आहेत.

सरकाराच्या दूरदृष्टीमुळे भारतातील वाहनांची सुरक्षा विश्वस्तरीय मानकांसारखी बनवण्यासाठी राबविलेला हा एक प्रशंसनीय विकास आहे. कारचालकांना कमीत मी दुखापत व्हाव्यात यावर काम करण्यासोबतच, ही नियमने पायी चालणाऱ्यांना वाहनाने धक्का लागण्यापासूनच्या सुरक्षिततेसही व्यापतात. अग्रवर्ती वाहन सुरक्षिततेची ही पद्धत, २०२० पर्यंत रस्त्यावरील मृत्यूचे प्रमाण अध्र्यापर्यंत घटवण्याच्या राष्ट्रीय कृती योजनेचा एक अविभाज्य भाग आहे, व औद्योगिकी या दूरदृष्टीला वास्तवात आणण्यासाठी संशोधन व विकास (आर एंड डी), चाचणी आणि मूल्य निर्धारणात गुंतवणूक करत आहे.

पण हा मोठा प्रयत्न एका लहानशा ढिल्या टोकाने धोक्यात आहे. भारतातील मोटारगाडय़ांतून प्रवास करणाऱ्या व्यक्तींमध्ये सीट बेल्ट लावण्याचा विस्तृतपणे पसरलेला तिटकारा. एक देश म्हणून, आपण विनयशील सीट बेल्टच्या क्षमतांची कदर करण्यात विफल ठरलो आहोत. सीट बेल्ट, टक्कर होण्याच्या परिस्थितीमध्ये यात्रेकरूंना त्यांच्या सीट्सवर खिळवून ठेवत एक तर स्टएअरिंगशी किंवा खिडकीशी आदळण्यापासून रोखून त्यांचा जीव वाचवतो. अधिक विध्वंसक परिस्थितींमध्ये, जर सीट बेल्ट परिधान केलेला नसल्यास प्रवासी वाहनातून बाहेर फेकला जाऊन त्यांना गंभीर इजा झालेल्या आहेत.

एअरबॅग्ज तसेच इतर उपकरणे महत्त्वाची असताना, सीट बेल्ट हीच वाहनामधील मूलभूत बचावकारी संरचना आहे. सीट बेल्ट्स, टक्कर होण्यापासूनच्या अतिरिक्त बचावकारी प्रणाली आहेत ज्या एअरबॅग्जच्या तुलनेत अटकाव करण्यामध्ये ५० टक्के अधिक प्रभावकारी असतात व ज्या अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यासाठी दिलेल्या आहेत.

सुखद बातमी अशी आहे की, जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल स्टेट्स रिपोर्ट इन रोड सेफ्टी (२०१५) च्या अनुसार सीट बेल्ट लावल्याने चालकांमध्ये मृत्यू होण्याच्या धोक्यामध्ये ४५ टक्क्यांनी घट होते. पुढच्या सीटवरील यात्रेकरूंसाठी, जर त्यांनी सीट बेल्ट लावलेला असल्यास टक्कर होऊन मृत्यू होण्याचा धोका ५० टक्क्यांनी कमी होतो. गंभीर इजा होण्याचाही धोका त्यांच्यासाठी ४५ टक्क्यांपर्यंत कमी होतो. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार मागील सीटवरील यात्रेकरूंचा मृत्यू होणे आणि गंभीर इजा होणे यात २५ टक्क्यांपर्यंत कपात होऊ  शकते.

अमेरिकेमध्ये, द नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एनएचटीएसए) नियमितपणे सीट बेल्टच्या वापरामुळे वाचवलेल्या जीवांचे अनुमान लावत असते (एअरबॅग्ज, मद्यपानासाठीचे कमीत कमी आवश्यक वय याचे कायदे आणि असेच अशाच आणखी गोष्टींप्रमाणेच). सीट बेल्ट लावल्याने वाचलेल्या जीवांची संख्या स्थिरपणे वाढत असून, एकाच वर्षांमध्ये (२०१५) ती १३,९४१ इतकी पोहोचली. सीट बेल्टच्या वापराने मागील पाच वर्षांत अमेरिकेमध्ये जवळपास ६४,००० जीव वाचवण्यात मदत झाली. भारत यातून काय शिकवण घेऊ  शकतो?

दर वर्षी, एनएचटीएसए ‘सीट बेल्ट्सचा जर १०० टक्के वापर केला गेला असता तर वाचवल्या जाऊ  शकत असलेल्या जीवांची संख्या’ याचेही अनुमान लावत असते. ज्या पीडितांनी सीट बेल्ट्स न लावल्याने आपले जीव गमावले त्यांची संख्या पाच वर्षांमध्ये १५,००० आहे. भारतामध्ये, आपण असे कसलेही पृथक्करण करत नाही. पण निर्भेळपणे, सीट बेल्टच्या वापराने जीव वाचवण्याच्या संधी किती तरी जास्त प्रमाणात आहेत.

सर्व वस्तुस्थिती समोर असताना, हे दुर्दैवी आहे की जगभरात सीट बेल्ट वापराच्या निकृष्ट देशांमध्ये भारत येतो. हे महत्त्वाचे आहे की, भारतभरातील अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी कारमध्ये बसणाऱ्यांनी सीट बेल्टचा पूर्ण वापर होत आहे याची खातरजमा करायला हवी. पण याच्याही आधी, कार वापरकर्त्यांनी रस्त्यावर प्रवास करतानाच्या प्रत्येक खेपेला आपापले सीट बेल्ट वापरण्यासाठी स्वत:च वचनबद्ध व्हायला हवे.

अशा परिस्थितींमध्ये एअरबॅग्जचा प्रवेश झाल्यावर काय घडणार आहे आता? जवळपास सर्व भारतीय मोटारगाडय़ा पुढील दोन वर्षांमध्ये स्पोर्ट एअरबॅग्ज वापरू लागतील. पुन्हा इथेही, चिंतेचे कारण थोडे जास्त आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षेच्या दृष्टीने, एअरबॅग्ज गाडीतील खिळवून ठेवणाऱ्या प्रणालीचा महत्त्वाचा भाग असला तरीही, ज्या प्रकरणांमध्ये मोटारीमध्ये बसलेल्यांनी सीट बेल्ट लावलेला नसल्यास त्यांचा प्रभाव वास्तविकपणे नुकसानकारक असू शकतो. टक्कर होण्याच्या वेळेस जर यात्रेकरूंनी सीट बेल्ट लावलेला नसण्याच्या प्रकरणांमध्ये, एअरबॅग अधिक हानीला कारणीभूत ठरू शकते.

गैर कार्यकारी शहरामध्ये विमानतळापासून काही शहरांपर्यंत जाण्यासाठी टॅक्सी करत असताना, सीट बेल्ट आणि/किंवा बक्कल शोधण्याच्या आव्हानाला मला सतत सामोरे जावे लागले आहे. भारतीय मानसिकतेमध्ये सुरक्षिततेची जाणीव या नित्य जीवनाच्या एका महत्त्वाच्या भागाची उणीव आहे. मला वाटते की या विषयावर सतत शिक्षित करत राहणेच हा या परिस्थितीवर मात करण्याचा एकमेव मार्ग आहे. मी त्या दिवसाबाबत आशावादी आहे जेव्हा सगळे वाहनचालक तेव्हाच त्यांच्या गाडीला सुरू करतील जेव्हा रस्त्यावरील अपघाती मृत्यूंना घटवण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट्स लावलेले असतील.

सी. व्ही. रामन मारुती सुझुकीच्या संशोधन व विकास विभागाचे प्रमुख

First Published on September 8, 2017 2:28 am

Web Title: seat belt information seat belt security